गळफास घेत विवाहितेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:06 IST2021-03-18T04:06:26+5:302021-03-18T04:06:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : जोगेश्वरी परिसरात एका विवाहितेने सोमवारी गळफास घेत आत्महत्या केली. सासरच्या मंडळींच्या जाचाला कंटाळून तिने ...

Suicide of a married woman by hanging | गळफास घेत विवाहितेची आत्महत्या

गळफास घेत विवाहितेची आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : जोगेश्वरी परिसरात एका विवाहितेने सोमवारी गळफास घेत आत्महत्या केली. सासरच्या मंडळींच्या जाचाला कंटाळून तिने हे पाऊल उचलल्याचे तिच्या घरच्यांचे म्हणणे आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची विनंती तिच्या घरच्यांनी मेघवाडी पोलिसांना केली आहे.

जोगेश्वरी पूर्वच्या सर्फराज अली चाळीमध्ये ही विवाहिता राहत होती. लग्नाला दीड वर्षे झाली. तीन वर्षांची मुलगी आहे. पीडित महिलेच्या सासरच्या मंडळींकडून तिचा सतत छळ केला जात होता, असा आरोप तिच्या आईने केला आहे. काही दिवसांपूर्वी ती आईकडे राहायला आली होती. त्यानंतर सासरी परतली, त्याच्या आठवड्याभरातच तिने हे पाऊल उचलले. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जोगेश्वरीच्या ट्रॉमा केअर रुग्णालयात पाठविण्यात आला. तिचा पती कामानिमित्त बाहेरगावी असतो. त्याच दरम्यान तिच्या सासरच्यांनी केलेल्या जाचात तिचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी सासरच्या मंडळींना कठोर शिक्षा दिली जावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

Web Title: Suicide of a married woman by hanging