रुग्णालयात जवानाची आत्महत्या
By Admin | Updated: November 22, 2015 02:19 IST2015-11-22T02:19:09+5:302015-11-22T02:19:09+5:30
पोटदुखीमुळे खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या भारतीय सैन्यदलातील एका जवानाने रुग्णालयातच गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शनिवारी कफ परेड येथे उघडकीस आली.

रुग्णालयात जवानाची आत्महत्या
मुंबई : पोटदुखीमुळे खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या भारतीय सैन्यदलातील एका जवानाने रुग्णालयातच गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शनिवारी कफ परेड येथे उघडकीस आली. जसबिर सिंग (२२) असे त्याचे नाव असून, तो नाशिक येथील तोफखाना विभागात कार्यरत होता. आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
जसबीर सिंग मूळचा पंजाबचा असून, प्रशिक्षणासाठी कफ परेड येथील नेव्ही हाउसमध्ये राहण्यास होता. काही दिवसांपासून पोटदुखीमुळे आजारी होता. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास जास्त त्रास होऊ लागल्याने त्याला कफ परेड येथील अश्विनी हॉस्पिटमध्ये दाखल करण्यात आले. तेथे एका स्वतंत्र खोलीमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. मध्यरात्रीच्या सुमारास तेथील पंख्याला डोक्यावरील पगडीचा वापर करून त्याने गळफास घेत आत्महत्या केली. शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. घटनास्थळाहून सुसाईड नोट मिळाली नाही. सिंगच्या मृत्यूचे नेमके कारण समोर आले नसून या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती कफ परेड पोलिसांनी दिली.