शाळेच्या हलगर्जीमुळेच आत्महत्या

By Admin | Updated: February 24, 2015 22:24 IST2015-02-24T22:24:54+5:302015-02-24T22:24:54+5:30

खांदा वसाहतीतील न्यू हॉरिझोन पब्लिक स्कूलमधील सहावीत शिकणाऱ्या गौरव कंक या विद्यार्थ्याच्या आत्महत्येमागे शाळेचा हलगर्जीपणाच कारणीभूत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.

Suicide due to school deficiency | शाळेच्या हलगर्जीमुळेच आत्महत्या

शाळेच्या हलगर्जीमुळेच आत्महत्या

पद्मजा जांगडे, पनवेल
खांदा वसाहतीतील न्यू हॉरिझोन पब्लिक स्कूलमधील सहावीत शिकणाऱ्या गौरव कंक या विद्यार्थ्याच्या आत्महत्येमागे शाळेचा हलगर्जीपणाच कारणीभूत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. या शाळेत इयत्ता सहावी ते अकरावीचे वर्ग सकाळच्या सत्रात तर पहिली ते पाचवीचे वर्ग दुपारच्या सत्रात भरवले जातात. मंगळवारी सकाळी गौरवला शिक्षिकेने केलेली मारहाण सहन न झाल्याने त्याने शाळेच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली. त्याला खांदा वसाहतीतील अष्टविनायक रुग्णालयात दाखल केले असता मृत घोषित करण्यात आले.
गौरवला रुग्णालयात दाखल केल्यावर शाळेतील एकही जबाबदार व्यक्ती याठिकाणी उपस्थित नव्हती. त्यामुळे पालक आणि नातेवाइकांमधून संताप व्यक्त करण्यात आला. त्याला मृत घोषित करण्यात आल्यावरही शाळेच्या मुख्याध्यापिका अथवा शिक्षिका रुग्णालयात आल्या नाहीत. दुपारच्या सत्राला सुट्टी देण्यात आली तरी नेमके कारण पालकांना सांगण्यास टाळाटाळ करण्यात येत होती.
२००७ मध्ये खांदा वसाहतीत न्यू हॉरिझोन पब्लिक स्कूल ही शाळा सुरू करण्यात आली. शाळेने सात मजली भव्य इमारत बांधली असली तरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत दुर्लक्षच होत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. शाळेत दर दोन महिन्यांनी शिक्षक-पालक मीटिंग होत असली तरी पालकांच्या तक्रारीकडे कायमच दुर्लक्ष होत आले आहे.

Web Title: Suicide due to school deficiency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.