गळफास लावून फौजदाराने केली आत्महत्या

By Admin | Updated: September 2, 2014 03:14 IST2014-09-02T03:14:41+5:302014-09-02T03:14:41+5:30

गावदेवी पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले प्रशिक्षणार्थी फौजदार संदीप पोखरकर यांनी आज सायन, प्रतीक्षानगरातील राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली.

Suicide committed by Faujdar by hanging | गळफास लावून फौजदाराने केली आत्महत्या

गळफास लावून फौजदाराने केली आत्महत्या

सायन येथील घटना
मुंबई : गावदेवी पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले प्रशिक्षणार्थी फौजदार संदीप पोखरकर यांनी आज सायन, प्रतीक्षानगरातील राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. दुपारी चारच्या सुमारास संदीप यांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले.
पोलिसांच्या माहितीनुसार संदीप आज दिवसपाळीला होते. मात्र ते कामावर न आल्याने पोलीस ठाण्यातील सहकारी त्यांना फोन करीत होते. संदीप फोन घेत नसल्याने ते वास्तव्यास असलेल्या इमारतीतील पोलीस शिपायास पोलीस ठाण्यातून फोन गेले. हा शिपाई संदीप यांच्या घरी गेला तेव्हा घर आतून बंद होते. बराच वेळ त्याने दार ठोठावले. मात्र आतून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने दरवाजा तोडण्यात आला असता बेडरूममध्ये संदीप पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. त्यांना रुग्णालयात  तत्काळ दाखल करण्यात आले. मात्र उपचारांपूर्वीच त्यांना मृत घोषित केले. मूळचे सांगली, इस्लामपूरचे  रहिवासी असलेले संदीप यांनी हे पाऊल का उचलले याचा तपास वडाळा टीटी पोलीस करीत आहेत. (प्रतिनिधी)
दारूच्या नशेत तरुणाने 
 
घेतला पोलिसाचा जीव
मुंबई : दारूच्या नशेत बेदरकार गाडी चालवून नीलेश मोदी (36) या तरुणाने वाहतूक पोलिसाचा जीव घेतला, तर दुस:याला गंभीर जखमी केले. काल मध्यरात्री जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर मोदीच्या झेनने वाहतूक पोलिसांची बाईक उडवली. वाहतूक विभागात फौजदार असलेले राजाराम देसाई (53) या अपघात ठार झाले.

 

Web Title: Suicide committed by Faujdar by hanging