Join us

नोकरीवरून काढले म्हणून केले आत्महत्येचे नाट्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2018 20:25 IST

४ तासानंतर पोलिसांनी केली सुखरूप सुटका 

मुंबई - वरळी येथील दूरदर्शनच्या टॉवरवर आत्महत्या करण्यासाठी चढलेल्या युवकाची पोलिसांनी सुखरूप सुटका केली आहे. या युवकाचं नाव अयोध्या पासवान  (वय - ३०) हे आहे.अयोध्या  हा एका कंपनीत वाहनचालकांचे काम करायचा. तो विठ्ठलवाडी येथे राहणार असून त्याला कामावरून काढले होते आणि आर्थिक परिस्थिती ढासळल्याने त्याने आत्महत्येचा निर्णय घेतला होता. मात्र पोलिसांनी त्याला बचावले असून. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी सतर्कता दाखवून अयोध्याला टॉवरवरून झाली उतरवले. जवळजवळ ४ तास दूरदर्शनच्या टॉवरवर चढून नाट्यमयरित्या सर्वांचे लक्ष केंद्रित केले होते. मात्र, पोलिसांनी दखल घेत टॉवरवरून अयोध्याला खाली उतरले आणि नजीकच्या रुग्णालयात घेऊन गेले. याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केल्याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

टॅग्स :मुंबईआत्महत्या