सुपरवायझरच्या कार्यालयातच आत्महत्येचा प्रयत्न

By Admin | Updated: September 6, 2015 00:57 IST2015-09-06T00:57:26+5:302015-09-06T00:57:26+5:30

सलग १५ वर्षे नोकरी केल्यानंतर अचानक कामावरून कमी केल्याने व्यथित झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याने सुपरवायझरच्या केबीनमध्येच फिनॉल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

Suicide attempt at Supervisor's office | सुपरवायझरच्या कार्यालयातच आत्महत्येचा प्रयत्न

सुपरवायझरच्या कार्यालयातच आत्महत्येचा प्रयत्न

ठाणे : सलग १५ वर्षे नोकरी केल्यानंतर अचानक कामावरून कमी केल्याने व्यथित झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याने सुपरवायझरच्या केबीनमध्येच फिनॉल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.
संदीप बनसोडे असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. ठेकेदाच्या अन्याय्य वागणुकीविरोधात संदीप याने कामगारांचे संघटन केले होते. त्यामुळे मागील महिन्यात त्याला ठेकेदाराने अचानक कामावरून कमी केले.
या संदर्भात त्याने विनंत्या करूनही त्याला कामावर परत घेतले जात नसल्याने तो व्यथित झाला होता. शनिवारी सुपरवायझरने त्याला कामावर घेण्यास नकार दिल्याने संदीपने फिनॉल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

Web Title: Suicide attempt at Supervisor's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.