Join us

सुहास बहुळकर यांना सांस्कृतिक जीवनगौरव पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 06:13 IST

चतुरंग प्रतिष्ठानचा सांस्कृतिक जीवनगौरव पुरस्कार यंदा चित्रकार सुहास बहुळकर यांना जाहीर झाला आहे.

मुंबई : चतुरंग प्रतिष्ठानचा सांस्कृतिक जीवनगौरव पुरस्कार यंदा चित्रकार सुहास बहुळकर यांना जाहीर झाला आहे. डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखालील डॉ. उदय निरगुडकर , डॉ. कविता रेगे, दीपक घैसास, चंद्रकांत कुलकर्णी, सुधीर जोगळेकर आणि रवींद्र पाथरे यांच्या निवड समितीने यंदाच्या सांस्कृतिक क्षेत्रीय पुरस्कारासाठी एकमताने ही निवड केली आहे.चतुरंग प्रतिष्ठानतर्फे १९९१ पासून दरवर्षी सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक यापैकी स्वीकृत क्षेत्रात मौलिक कार्याने लक्षणीय भर घालून देशाचे नाव समृद्ध करणाऱ्या व्यक्तीला जीवनगौरव पुरस्कार देण्यात येतो. मानपत्र, सन्मानचिन्ह आणि तीन लाख रुपयांचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या जीवनगौरव पुरस्काराच्या प्रदानाचा दोन दिवसीय रंगसंमेलन सोहळा डिसेंबर २०१८मध्ये मुंबईत करण्याचा संस्थेचा मानस आहे.चित्रकलेसारख्या अभिजात, ललित कलाशाखेत अखंड कार्यरत राहून केवळ आंतरराष्ट्रीय ख्यातीचा चित्रकार हा सन्मानच मिळविला. या पुरस्काराविषयी सुहास बहुळकर यांनी सांगितले की, हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या अंगभूत आणि निष्ठापूर्ण कलाप्रेमाला रसिक समाजाचे कृतज्ञ वंदन आहे.

टॅग्स :मुंबई