नाका कामगारांना पेणमध्ये सुगीचे दिवस

By Admin | Updated: May 12, 2015 22:50 IST2015-05-12T22:50:35+5:302015-05-12T22:50:35+5:30

मान्सूनपूर्व कामांच्या पूर्वतयारीत सारेच गुंतले असून घर दुरुस्ती, घरांची कौले, शेतीचे बांध घालणे, घरांचे पत्रे बदलणे या कामांची लगबग सुरू झाली आहेत.

Sugarcane Day in Pain to Naka Workers | नाका कामगारांना पेणमध्ये सुगीचे दिवस

नाका कामगारांना पेणमध्ये सुगीचे दिवस

दत्ता म्हात्रे, पेण
मान्सूनपूर्व कामांच्या पूर्वतयारीत सारेच गुंतले असून घर दुरुस्ती, घरांची कौले, शेतीचे बांध घालणे, घरांचे पत्रे बदलणे या कामांची लगबग सुरू झाली आहेत. याचसाठी पेण नगरपरिषदेच्या समोरील कोतवाल चौकात सकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत दोन ते अडीच हजार नाका कामगार रोजंदारीसाठी या ठिकाणी उभे राहत असून या सर्वांना सध्या ३०० ते ३५० रुपये या दराने रोजगार मिळत आहे. मान्सूनपूर्व कामांसाठी या कामगारांना हमखास रोजगार मिळतो. दररोज ६ ते ७ लाख रुपयांच्या रोजगारातून उलाढाल होत आहे. पेणचा हा कोतवाल चौक सध्या नाका कामगारांच्या गर्दीने गजबजत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
पावसाळा तोंडावर आल्याने सगळ्यांचीच धावपळ उडालेली आहे. हवामानशास्त्र विभागाने १ जून रोजी मान्सूनचे आगमन वेळेवर होणार ही शुभवार्ता दिल्याने खरीप हंगामी पूर्वतयारी व घरांच्या देखभाल दुरुस्तीकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. पावसाळ्यात घरांची पडझड होऊ नये यासाठी प्रत्येकाचा आपापली घरे, इमारती, गुरांचे गोठे, घरासमोरील पडक्या छपरांची कामे उरकण्याकडे प्राधान्याने कल असतो. याशिवाय नव्याने होणारी बांधकामे, शेतीची बांधबंदिस्ती, गादी वाफे, चर खोदणे ही कामे करावीच लागतात. या कामांसाठी मजुरांची नितांत गरज असते. घरांच्या दुरुस्तीसाठी छप्परकाम करणारे सुतार, गवंडी व शेडकाम पत्रे बसविणारे वेल्डर, फिटर या कुशल तांत्रिक कारागिरांना मदतनीस म्हणून नाका कामगार आवश्यक असतात.
शेतकरी असो वा घरमालक या सर्वांना मजूर मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे पेण नगर परिषदेसमोरील कोतवाल चौकात मजुरी मिळविण्यासाठी येणारे नाका कामगार सध्या या कामगारांना सुगीचे दिवस आले आहेत. ३०० ते ३५० रुपये या कामगारांना मजुरीचे दर मिळत आहे. येत्या खरीप हंगामापर्यंत यांना रोजगार उपलब्ध होणार असून दररोज २००० ते २५०० कामगारांची उपस्थिती असते. (वार्ताहर)

Web Title: Sugarcane Day in Pain to Naka Workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.