पोर्ट्स कार्यकारी संचालकपदी सुधीर कानविंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 01:07 IST2019-07-17T01:07:28+5:302019-07-17T01:07:30+5:30

इंडियन पोर्ट्स असोसिएशनच्या कार्यकारी संचालक (आयटी) पदावर सुधीर कानविंदे यांची निवड करण्यात आली आहे.

Sudhir Kanvinde as Ports Executive Director | पोर्ट्स कार्यकारी संचालकपदी सुधीर कानविंदे

पोर्ट्स कार्यकारी संचालकपदी सुधीर कानविंदे

मुंबई : इंडियन पोर्ट्स असोसिएशनच्या कार्यकारी संचालक (आयटी) पदावर सुधीर कानविंदे यांची निवड करण्यात आली आहे. सोमवारी नवी दिल्लीत त्यांनी या पदाचा कार्यभार स्वीकारला. देशाच्या ७५१७ किमी किनारपट्टीचा योग्य वापर करून देशातील बंदरांची स्थिती अधिक चांगली करावी व त्याचा वापर वाढवावा यासाठी इंडियन पोर्ट्स असोसिएशनतर्फे प्रयत्न केले जातात. आयटी क्षेत्रातील २५ वर्षांचा अनुभव असलेल्या कानविंदे यांच्या नियुक्तीमुळे सागरमाला प्रकल्प व बंदरांमधील दैनंदिन कामकाज अधिक सुसूत्रतेने चालण्यासाठी आयटीचा अधिक प्रभावीपणे वापर करण्यासाठी प्रयत्न वाढीस लागेल.

Web Title: Sudhir Kanvinde as Ports Executive Director