फूस लावून मुलीला पळविले
By Admin | Updated: January 28, 2015 22:49 IST2015-01-28T22:49:47+5:302015-01-28T22:49:47+5:30
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन तरूणीला पळवून नेल्याची धक्कादायक घटना खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

फूस लावून मुलीला पळविले
खालापूर : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन तरूणीला पळवून नेल्याची धक्कादायक घटना खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या प्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रवी नाथा पवार, रा. वाल्मिकीवाडी, खालापूर यांच्या घरासमोर बाबू मोहन बरडे (२२) हा तरूण राहतो. घराशेजारीच राहत असल्याने बाबूचे रवी पवार यांच्या घरी येणे-जाणे होते. याच गोष्टीचा फायदा घेवून बरडे याने पवार यांच्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवले व तिच्याशी प्रेमसंबंध निर्माण केले. बरडे याने लग्नाचे आमिष दाखवल्याने अल्पवयीन तरूणीचा त्याच्यावर विश्वास बसला.त्याचा गैरफायदा घेवून बरडे याने सदर अल्पवयीन तरूणीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. पवार यांना ही घटना कळताच त्यांनी मुलीचा सर्वत्र शोध घेतला परंतु ती न सापडल्याने अखेर रवी पवार यांनी खालापूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गायकवाड हे करत आहेत. (वार्ताहर)