असा रंगला कानपिचक्या आणि टाळ्यांचा खेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:26 IST2021-02-05T04:26:18+5:302021-02-05T04:26:18+5:30
पालिका हेरिटेज वॉक बातमी जाेड मुख्यालयाची इमारत बांधताना अंदाजित खर्चापेक्षा कमी खर्च आला, असा उल्लेख महसूलमंत्री बाळासाहेब थाेरात यांनी ...

असा रंगला कानपिचक्या आणि टाळ्यांचा खेळ
पालिका हेरिटेज वॉक बातमी जाेड
मुख्यालयाची इमारत बांधताना अंदाजित खर्चापेक्षा कमी खर्च आला, असा उल्लेख महसूलमंत्री बाळासाहेब थाेरात यांनी केला. हा धागा पकडून अजित पवार यांनी प्रकल्पांसाठी वाढणाऱ्या खर्चावर बोट ठेवले. त्यावेळचा आदर्श आपण ठेवला पाहिजे. नाहीतर वाढीव खर्चाला मंजुऱ्या द्याव्या लागतात. २५ कोटींचे अंदाजपत्रक असते आणि खर्च ५०० कोटींपर्यंत पोहोचतो असे होऊ देऊ नका, असा सल्लाही त्यांनी पालिकेला दिला.
* फडणवीस, कंगनाला टोला
बाळासाहेब थोरात यांनी यावेळी अभिनेत्री कंगना रनाैतला टोला लगावला. मुंबईला पाकव्याप्त कश्मीर म्हणणारेही या शहरात सुरक्षित राहतात. विविध धर्मांचे लोक या शहरात एकत्र राहतात, असे थोरात म्हणाले. तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली मेट्रोमधील त्यांच्या प्रवासाचा फोटो ट्विट करून मुंबईच्या विमानतळावर असे मेट्रोने जाता येईल का, अशा शब्दात महायुतीला चिमटा काढला होता. त्यालाही थोरात यांनी प्रतिउत्तर दिला. फडणवीस यांनी ज्या मेट्रोमध्ये फोटो काढला, ती मेट्रो कॉंग्रेसने सुरू केली. अशी आठवण करून देत फडणवीस लवकरच नागपूर विमानतळावर मेट्रोनेच जातील अशा शब्दात त्यांनी प्रत्युत्तर दिले.
* तर फसाल...
आजवर जगाला सुरतेची लूट माहिती होती. मुंबईतील ऐतिहासिक संस्था गुजरातला नेण्याचा घाट घातला जात आहे, पण मुंबईला लुटण्याचा प्रयत्न कराल तर फसाल, असा सल्लाही बाळासाहेब थोरात यांनी भाजपला नाव न घेता लगावला.
....................