साडेसात वर्षापासूनच्या कामाला यश

By Admin | Updated: September 4, 2014 02:31 IST2014-09-04T02:31:10+5:302014-09-04T02:31:10+5:30

मोडकसागर तलावाच्या जलबोगद्यात पाणी आणण्यासाठी लेकटॅपिंग करण्यात आले ते काम तब्बल साडेसात वर्षापूर्वी सुरू करण्यात आले होते.

Success in the work of the year | साडेसात वर्षापासूनच्या कामाला यश

साडेसात वर्षापासूनच्या कामाला यश

मुंबई : मोडकसागर तलावाच्या जलबोगद्यात पाणी आणण्यासाठी लेकटॅपिंग करण्यात आले ते काम तब्बल साडेसात वर्षापूर्वी सुरू करण्यात आले होते. 28 फेब्रुवारी 2क्क्8 ला पहिले लेकटॅपिंग मोडकसागरमध्ये करण्यात आले. हा प्रकल्प बुधवारी यशस्वी ठरला. 
मुंबईची पाणीटंचाई दूर करण्यासाठी पालिकेने मोडकसागर बोगदा प्रकल्प हाती घेतला. मोडक सागर हे धरण वैतरणा नदीच्या सर्वात खालच्या बाजूला बांधण्यात आले आहे. त्यापेक्षा अधिक उंचीवर मध्य वैतरणा आणि अप्पर वैतरणा ही दोन धरणो आहेत. या दोन्ही धरणांतील पाणी मोडकसागरमध्ये आणले जाते. याकरिता यापूर्वीच दोन बोगदे बांधण्यात आले आहेत. मात्र, पाण्याचा दाब अधिक राहावा यासाठी धरणाच्या खालच्या पातळीवरील बोगद्यासाठी सुरुंगस्फोट आवश्यक होता. बुधवारी खालच्या पातळीत सुरुंगस्फोट घडवून आणण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
 
मुंबईला मध्य वैतरणा प्रकल्पांतर्गत प्रतिदिन 455 दशलक्ष लीटर्स आणि प्रस्तावित गारगाई प्रकल्पांतर्गत प्रतिदिन 44क् दशलक्ष लीटर्स असे एकूण प्रतिदिन 895 दशलक्ष लीटर्स पाण्याचा पुरवठा बोगद्याद्वारे होणार आहे. शिवाय सध्या अस्तित्वातील वैतरणा-कम-तानसा योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या आणि अनेक दशके कार्यरत असलेल्या जुन्या बोगद्याचे परिनिरीक्षण करून देखभालीची कामे शक्य होणार आहेत.
 
222
कोटींचा हा प्रकल्प आहे. केंद्र शासनाच्या जवाहरलाल नेहरू 
नागरी पुनरुत्थान अभियानांतर्गत 
या प्रकल्पाला मंजूर झालेल्या 124.37 कोटींच्या 35 टक्के आणि राज्य शासनाकडील 15 टक्के अर्थसाहाय्य प्राप्त झाले आहे.
 
चार-मुंबई 
(मध्य वैतरणा) पाणीपुरवठा प्रकल्पामध्ये खालील सहा प्रकल्प घटकांचा समावेश आहे
मध्य वैतरणा धरण
मोडकसागर येथे आदान मनो:याचे बांधकाम, मोडकसागर ते बेलनाला दरम्यान जलवहन बोगदा
नगरबाह्य विभागात मृदू पोलादी जलवाहिन्या टाकणो
भांडुप संकुल जलप्रक्रिया केंद्र
भांडुप संकुल 
येथे उचंदन केंद्र
भांडुप संकुल येथे महासंतुलन जलाशय

 

Web Title: Success in the work of the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.