राष्ट्रीय स्पर्धेत शारदाश्रमच्या विद्यार्थ्यांचे यश

By Admin | Updated: January 14, 2017 07:24 IST2017-01-14T07:24:50+5:302017-01-14T07:24:50+5:30

महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषद आयोजित नांदेड येथे राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत दादर येथील शारदाश्रम विद्यामंदिर मुलांच्या माध्यमिक

Success of students of Shardashram in National Championship | राष्ट्रीय स्पर्धेत शारदाश्रमच्या विद्यार्थ्यांचे यश

राष्ट्रीय स्पर्धेत शारदाश्रमच्या विद्यार्थ्यांचे यश

मुंबई : महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषद आयोजित नांदेड येथे राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत दादर येथील शारदाश्रम विद्यामंदिर मुलांच्या माध्यमिक विद्यालयातील शुभम सकपाळ याची १७ वर्षांखालील वयोगटात व स्वयम पडेलकर याने तृतीय क्रमांक पटकावून त्याची १४ वर्षांखालील वयोगटात महाराष्ट्र संघात निवड झाली.
शारदाश्रम विद्यामंदिर माध्यमिक विद्यालय गेली अनेक वर्षे विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना वाव देऊन कबड्डी, कुस्ती, लंगडी, क्रिकेट, बॉक्सिंग, रोप स्किपिंग व कॅरम अशा अनेक क्रीडा प्रकारांमध्ये प्रावीण्य प्राप्त करीत आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देऊन त्यांचा उत्कर्ष करीत आहे. तिरूचेरापल्ली, तामिळनाडू येथे झालेल्या राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत या खेळाडूंनी द्वितीय व तृतीय क्रमांक संपादन केला.

Web Title: Success of students of Shardashram in National Championship