सागरी सेतू प्रकल्पग्रस्तांचे यश
By Admin | Updated: December 20, 2014 22:08 IST2014-12-20T22:08:53+5:302014-12-20T22:08:53+5:30
न्हावा शिवडी सागरी सेतूसंदर्भात महत्त्वाचा निर्णय शुक्रवारी सिडकोच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

सागरी सेतू प्रकल्पग्रस्तांचे यश
न्हावा शेवा : न्हावा शिवडी सागरी सेतूसंदर्भात महत्त्वाचा निर्णय शुक्रवारी सिडकोच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना साडेबावीस टक्के भूखंडाचे पॅकेज देण्यासोबतच गॅसलाईनसाठी संपादिलेल्या जमिनीलाही चांगले मोल आणि एमआयडीसी पाईपलाईनचे वाढीव दराने भाडे देण्याचाही महत्त्वाचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. प्रकल्पग्रस्तांसोबत गेल्या अडीच वर्षापासून चाललेल्या वाटाघाटीला त्यानिमित्ताने यश आले.
सिडकोच्या नवी मुंबई येथील कार्यालयात सिडको एमएमआरडीए, व्यवस्थापन व शिवडी न्हावा, गव्हाण, जासई, चिर्ले सागरी सेतू प्रकल्पग्रस्त संघटनेचे सल्लागार महेंद्र घरत व अध्यक्ष सुरेश पाटील, समितीचे सदस्य यांच्यासोबत शुक्रवारी चर्चा झाली. यावेळी सिडकोचे एमडी संजय भाटीया यांच्या पुढाकाराने व संघर्ष समितीच्या प्रयत्नाने ही चर्चा यशस्वी झाली. गेली ८ वर्ष एमआयडीसी पाईप लाईनचे भाडे मिळाले नव्हते ते वाढीव भावाप्रमाणे ६६ शेतकऱ्यांना ४६ लाख ७५ हजार देण्यात आले. प्रत्येक श्ोतकऱ्याला किमान ७० हजार ते २.५० लाख रूपयांपर्यंत रोेख रक्कम मिळाली. संघर्ष समितीच्या दुसऱ्या मागणीनुसार एनएच ४ बी व एस एच ५४ तसेच पाईप लाईन व गॅसलाईनसाठी नव्याने भुसंपादन करण्यात येत असलेल्या जमिनीला न्हावा शिवडी सागरी सेतू प्रमाणेच न्याय देऊन तशाप्रकारचे पॅकेज देण्यासंदर्भात एमडी संजय भाटीया यांनी महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून पॅकेज देण्यासंदर्भात तत्वता मंजुरी दिली.
समितीला न्हावा - शिवडी प्रोजेक्टसाठी दिलेले पॅकेज लेखी स्वरूपात दिले. त्यामध्ये विमानतळाप्रमाणे साडेबाविस टक्के भुखंड ज्यांना रोख रक्कम पाहिजे, त्यांना रोख रक्कम व सर्व प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांना विविध व्यवसाय शिक्षणानुसार सिडको खर्चाने प्रशिक्षण देण्यात येईल, तसेच प्रकल्पबाधीत शेतकऱ्यांना ५० टक्के कामे देण्यात येतील तसेच जासई, चिर्ले व तत्सम गावातील वाढीव गावठाणासाठी वापरण्यात आलेल्या जमिनी सिडकोने नोटीफिकेशनमधून वगळाव्यात व नैसर्गिक गरजेपोटी बांधलेली घरे कायम करावीत. यासंदर्भात होकारार्थी चर्चा झाली.
उद्याच्या या बैठकीला सिडको एमडी संजय भाटीया, सह एमडी व्ही.राधा, एमएमआरडीए उपायुक्त अनिल वानखेडे, संघर्ष समितीचे सल्लागार महेंद्र घरत, अध्यक्ष सुरेश पाटील, केसरीनाथ घरत, संदेश ठाकूूर, रघुनाथ ठाकूर, हेमंत पाटील, धर्माशेठ पाटील, माणिक म्हात्रे, धर्मदास घरत, अरूण म्हात्रे, भुमिअधिकारी कणसे व इतर शेतकरी उपस्थित राहतील.
संघर्ष समितीचा विजय
च्गेली अडीच वर्षे नेटाने सिडको व एमएमआरडीए व्यवस्थापनाला सळो की पळो करून मागण्यांवर ठाम राहिलेल्या संघर्ष समितीचा हा प्रचंड विजय आहे. रविवारी सकाळी १० वाजता समाज मंदिर जासई येथे प्रकल्पबाधीत शेतकऱ्यांची बैठक होऊन यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल व दिवंगत लोकनेते दि.बा.पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली सिडको, जेएनपीटी प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती वाटचाल ठेऊन अंतिम निर्णय ठरेल.