Join us
Daily Top 2Weekly Top 5

बूचर आयलंड आगीवर 40 तासांनंतर नियंत्रण मिळवण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 03:58 IST

मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जवाहर द्वीपावरील (बूचर आयलंड) तेलाच्या टाकीला शुक्रवारी सायंकाळी वीज कोसळून आग लागली होती.

मुंबई : मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जवाहर द्वीपावरील (बूचर आयलंड) तेलाच्या टाकीला शुक्रवारी सायंकाळी वीज कोसळून आग लागली होती. मुंबई पोर्ट ट्रस्टचे अग्निशमन दल आणि महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचा-यांनी शर्थीचे प्रयत्न करून रविवारी सायंकाळी आगीवर नियंत्रण मिळविले आहे. या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तब्बल ४० तास लागल्याचे मुंबई पोर्ट ट्रस्टकडून सांगण्यात आले.शुक्रवारी जवाहर द्वीपावरील १३ क्रमांकाच्या डिझेलच्या टाकीला वीज कोसळल्यामुळे आग लागली. शुक्रवारी रात्री ती आग विझविण्यात अग्निशमन दलाला यश आले, परंतु उष्णतेमुळे टाकीमधील वाफेचा स्फोट होऊन टाकीने पुन्हा पेट घेतला होता.

टॅग्स :बूचर बेटमुंबईआग