शक्तिप्रदर्शनासह अर्ज दाखल

By Admin | Updated: September 27, 2014 22:31 IST2014-09-27T22:31:31+5:302014-09-27T22:31:31+5:30

आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने उरण विधानसभा मतदारसंघातून आजच्या शेवटच्या दिवशी 15 उमेदवारांनी अर्ज भरल्याने अर्ज भरणा:यांची एकूण संख्या 32 झाली आहे.

Submit application with PowerPoint | शक्तिप्रदर्शनासह अर्ज दाखल

शक्तिप्रदर्शनासह अर्ज दाखल

>चिरनेर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने उरण विधानसभा मतदारसंघातून आजच्या शेवटच्या दिवशी 15 उमेदवारांनी अर्ज भरल्याने अर्ज भरणा:यांची एकूण संख्या 32 झाली आहे. 
शेवटच्या दिवशी प्रमुख राजकीय पक्षांपैकी भाजपाच्या वतीने महेश बालदी यांनी तर राष्ट्रवादीच्या वतीने जिल्हा सरचिटणीस प्रशांत पाटील यांनी शक्तिप्रदर्शन करीत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अतुल भगत यांनीही कार्यकत्र्याची रॅली काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने भेंडखळ या एकाच गावच्या दोघा सुपुत्रंनी दोन वेगवेगळय़ा राजकीय पक्षांच्या वतीने विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरल्याचे समोर आले आहे. 
राष्ट्रवादीचे प्रशांत पाटील आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अतुल भगत या दोघांचे भेंडखळ हेच जन्मगाव आहे. त्यामुळे हा चर्चेचा विषय बनला आहे. त्याचबरोबर तीन जिवाभावाचे मित्र एकमेकांच्या विरोधात निवडणुकीच्या निमित्ताने एकमेकांच्या समोर ठाकले आहेत. त्यामुळे ते तिघेही एकमेकांविरोधात कशा प्रकारे तोफ डागतात, हे पाहणो फार औत्सुक्याचे ठरणार आहे. 
सध्या मात्र व्हॉट्सअॅप आणि फेसबुकच्या माध्यमातून सोशल मीडियावर प्रचार यंत्रणा राबविण्यात अपक्षच उमेदवार उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील हेच सर्वात पुढे आहेत. ‘मी उरणकर आणि माझा आमदार उरणकर’ या मथळय़ाखाली रोज दोन-चार शेरोशायरींच्या निमित्ताने गोपाळ पाटील सोशल मीडियावर झळकत आहेत. त्याचबरोबर त्यांनी यापूर्वी शिवसेनेला दिलेल्या अल्टीमेटमची आठवणही ते सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला करून देत आहेत.  त्यांच्या या प्रचाराला सोशल मीडियातूनही पसंती मिळत आहे.
 
अलिबाग : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडीतही बिघाडी झाल्याने दोन्ही काँग्रेस एकमेकांच्या विरोधात विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहे. काँग्रेसपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे अलिबाग शहर अध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अॅड. मोहिते यांनीही कोणतीही मिरवणूक न काढता साधेपणाने अर्ज दाखल केला. याप्रसंगी त्यांच्यासमवेत मोठा समर्थक वर्ग होता. 
 
च्पनवेल : विधानसभा निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या आज शेवटच्या दिवशी राजकीय पक्षांच्या उमेदवारांची चांगलीच लगीनघाई झाली होती. आज काँग्रेस व शिवसेनेच्या उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले, तर त्यांच्यासोबत राष्ट्रवादी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या उमेदवारांनी देखील आपले उमदेवारी अर्ज दाखल केले.
च्भाजपाशी काडीमोड झाल्यानंतर पनवेल विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेने तालुक्यातील ओवे येथील उपसरपंच असलेले वासुदेव घरत यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले असून, त्यांनी आज आपली ताकद दाखवीत शेकडो शिवसैनिकांच्या साक्षीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
च्आमदार प्रशांत ठाकूर यांनी काँग्रेसला हात दाखवल्यानंतर आता काँग्रेसचे काय होणार, अशी चर्चा पनवेल तालुक्यात सुरू होती. मात्र प्रदेश काँग्रेसने रायगड जिल्हा अध्यक्ष व सिडको संचालक आऱ सी़ घरत यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवून गतप्राण झालेल्या काँग्रेसजनांमध्ये जीव टाकला आहे. आज काँग्रेसने जोरदार शक्तिप्रदर्शन करीत काँग्रेसची ताकद दाखवून दिल्याने पनवेल काँग्रेसमय झालेले दिसून आले.
त्याचप्रमाणो राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार माजी नगराध्यक्ष सुनील घरत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे केसरीनाथ पाटील यांनी शेकडो समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखल केला.
च्या वेळी शिवसेनेच्या मिरवणुकीमध्ये जिल्हा बबन पाटील, तालुकाप्रमुख रामदास पाटील, शिरीष बुटाला, परेश पाटील, सुनीत ठक्कर, काँग्रेसच्या मिरवणुकीत प्रदेश काँग्रेसचे नेते मुश्ताक अंतुले, कामगार नेते शाम म्हात्रे, जिल्हा सरचिटणीस डॉ. भक्तीकुमार दवे, माजी नगराध्यक्ष मोतीलाल बांठिया, डी़ एल़ भगत, अभिजित पाटील, सुदाम पाटील आदी उपस्थित होते. 
 

Web Title: Submit application with PowerPoint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.