Join us

ओबीसी आरक्षणाचे उपवर्गीकरण करा, हरिभाऊ राठोड यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 19:49 IST

OBC Reservation: ओबीसी आरक्षणाचे उपवर्गीकरण करावे, मराठा समाजाप्रमाणे बारा बलुतेदार यांना न्याय मिळावा, अशा मागण्यांसाठी माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली गुरूवारी आझाद मैदानात एकदिवशीय  आंदोलन करण्यात आले.

- श्रीकांत जाधवमुंबई  - ओबीसी आरक्षणाचे उपवर्गीकरण करावे, मराठा समाजाप्रमाणे बारा बलुतेदार यांना न्याय मिळावा, अशा मागण्यांसाठी माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली गुरूवारी आझाद मैदानात एकदिवशीय  आंदोलन करण्यात आले.

विमुक्त, बारा बलुतेदार, ओबीसी आणि अति पिछडा सेवा संघ या संघटनेतर्फे हे धरणे आंदोलन होते. यावेळी उमेद कर्मचारी संघटनेच्या उपाध्यक्षा निर्मला शेलार, नवनाथ पवार उपस्थित होते. मराठा आरक्षणाबरोबर बलुतेदारांनाही आरक्षण देण्यात यावे, मराठा आरक्षणाच्या जटिल प्रश्न सोडवण्यासाठी ओबीसी आरक्षणाची फेरवाटणी करून ३८ टक्के  आरक्षणाचे उपवर्गीकरण  करणे गरजेचे आहे, अशा मागण्या माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी यावेळी केल्या. भटक्या विमुक्तांच्या विविध मागण्या आजही प्रलंबित आहेत. मात्र त्यांच्या मागण्यांकडे सरकार लक्ष देत नाही त्यामुळे त्यांचा विकास खुंटला असल्याचे राठोड म्हणाले.

शाहीर अशोक कांबळे यांच्या आवाजाने मैदान दुमदुमले! यावेळी आंबेडकरी चळवळीतील लोकशाहीर अशोक कांबळे यांनी पोवाडे आणि लोकगीते सादर केली. फक्त पायदळ सेना होतो माझ्या भीमकडे ... या त्यांच्या पोवाड्याने संपूर्ण आजाद मैदान दणाणून गेले. 

टॅग्स :ओबीसी आरक्षणहरिसिंग राठोड