उपनिरीक्षकाला लाच घेताना अटक
By Admin | Updated: June 12, 2014 02:12 IST2014-06-12T02:12:01+5:302014-06-12T02:12:01+5:30
मनोर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षकाला केस शिथिल करण्याकरिता चार्जशीट लवकर कोर्टात पाठवितो, या प्रकरणी ३०,००० रु.ची लाच घेताना अप्पर पोलीस आयुक्त लाचलुचपत विभाग मुंबई येथील पोलीसांनी रंगेहात पकडले.

उपनिरीक्षकाला लाच घेताना अटक
मनोर : मनोर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षकाला केस शिथिल करण्याकरिता चार्जशीट लवकर कोर्टात पाठवितो, या प्रकरणी ३०,००० रु.ची लाच घेताना अप्पर पोलीस आयुक्त लाचलुचपत विभाग मुंबई येथील पोलीसांनी रंगेहात पकडले. पालघर न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
९ फेब्रुवारी २०१४ रोजी दोन गटात मारामारी झाली होती. त्यावेळी मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात आली. यावेळी एका गटातील आरोपी रमण कंडी फरार आहे. त्याच्याकडे अटकपूर्व जामिनसाठी पोलीस निरिक्षकाने ३० हजारांची लाच मागितली होती.