पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:35 IST2020-12-17T04:35:25+5:302020-12-17T04:35:25+5:30

मुंबई : गुन्ह्यांत आरोपी असलेल्या कंत्राटदाराला मदत करण्याच्या बहाण्याने ४० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत विभागाने मंगळवारी ...

Sub-Inspector of Police in the net of ACB | पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

मुंबई : गुन्ह्यांत आरोपी असलेल्या कंत्राटदाराला मदत करण्याच्या बहाण्याने ४० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत विभागाने मंगळवारी अटक केली. भारत ढेंबरे असे पोलिसाचे नाव असून त्याला लाचेचा २० हजार रुपयांचा हप्ता स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली.

............................................

विवाहितेची आत्महत्या नसून हत्येचा संशय

मुंबई : भांडुपमध्ये सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केलेल्या उज्ज्वला सातपुते-गलांडे या नवविवाहितेने रविवारी आत्महत्या केली. मात्र ही, आत्महत्या नसून तिची हत्या करण्यात आल्याचा संशय कुटुंबीयांनी वर्तवला आहे. त्यानुसार आता या दिशेनेही पोलीस अधिक तपास करत आहेत.

.............................................

ड्रग्ज तस्कर महिलेच्या पतीचा शोध सुरू

मुंबई : अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या सनम सय्यदला शुक्रवारी अटक केली. कारवाईदरम्यान एमडीचा १ कोटी १० रुपयांचा साठा आणि आठ लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली. सनमचा पती तारिक सय्यद ड्रग्जचा मोठा वितरक असून सनम किरकोळ स्वरूपात विक्री करणाऱ्यांना ‘एमडी’ उपलब्ध करून देत असे. सध्या तिच्या पतीचा शोध सुरू आहे.

.............................

Web Title: Sub-Inspector of Police in the net of ACB