उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 05:55 IST2018-07-17T05:55:01+5:302018-07-17T05:55:03+5:30

कपडे व्यापाऱ्याकडून १० हजारांची लाच मागितल्याप्रकरणी दिंडोशी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक बिपीन बाळकृष्ण चव्हाणवर एसीबीने सोमवारी गुन्हा दाखल केला.

Sub-inspector filed a complaint | उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल

उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल

मुंबई : कपडे व्यापाऱ्याकडून १० हजारांची लाच मागितल्याप्रकरणी दिंडोशी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक बिपीन बाळकृष्ण चव्हाणवर एसीबीने सोमवारी गुन्हा दाखल केला. कपड्यांच्या आॅर्डरचे पैसे न दिल्याने कपडे व्यापाºयाविरुद्ध दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल आहे. हे प्रकरण चव्हाणकडे आले. त्याने कारवाई थांबविण्यासाठी १० हजार मागितले. कपडे व्यापाºयाने एसीबीकडे या प्रकरणी तक्रार दिली. त्यानुसार, एसीबीने केलेल्या तपासात लाचखोर उपनिरीक्षक चव्हाण पैसे मागत असल्याचे समोर आले. त्यानुसार, त्यांनी सोमवारी चव्हाणवर गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे.

Web Title: Sub-inspector filed a complaint