मुंबई : मान्सूनला सुरुवात झाल्यावर वनविभाग, पर्यावरण संस्था व संघटना, शाळा-महाविद्यालयांकडून वृक्षारोपण मोहीम राबवली जाते. मिशन ग्रीन मुंबई या संस्थेच्या वतीने दहा हजारांहून अधिक ३० प्रजातींच्या झाडांचे सीडबॉम्ब तयार करण्यात आले आहेत. तसेच एक कोटी सीडबॉम्ब तयार करण्याचा संस्थेचा मानस आहे. या वेळी संस्थेने काही सीडबॉम्ब हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात फेकले. सायन कोळीवाडा येथील गुरूनानक कला, वाणिज्य आणि शास्त्र महाविद्यालयात ‘सीडबॉम्ब’ बनविण्याची नुकतीच एकदिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती. या वेळी विद्यार्थ्यांनी एक हजार सीडबॉम्ब तयार केले.मिशन ग्रीन मुंबईचे संस्थापक शुभजीत मुखर्जी यांनी सांगितले की, जवळपास ३० प्रजातींच्या झाडांची एक यादी वनविभागाकडून घेण्यात आली. ‘गोरीला प्लॅन्टेशन’ ही एक झाडे लावण्याची पद्धत आहे. घनदाट जंगलामध्ये जाणे शक्य नसते. तसेच खासगी जमिनीमध्ये प्रवेश नाकारला जातो. त्यामुळे अशा ठिकाणी वृक्षारोपण करण्यासाठी गोरीला प्लॅन्टेशन पद्धत वापरली जाते. त्यासाठी सीडबॉम्बस् तयार केले जातात. ते जमिनीवर पडले की त्यातून नव्या झाडांची निर्मिती होते. आतापर्यंत १० हजारांहून अधिक सीडबॉम्ब तयार करण्यात आले आहेत. सायन कोळीवाडा येथील गुरूनानक कला, वाणिज्य आणि शास्त्र महाविद्यालयात ‘सीडबॉम्ब’ बनविण्याचे एकदिवसीय कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन घेऊन एक हजार सीडबॉम्ब तयार केले.
ग्रीन स्ट्राइक! नॅशनल पार्कमध्ये फेकले गेले 10 हजार सीडबॉम्ब
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2019 08:00 IST