विद्यार्थ्यांनी आदर्श नागरिक बनण्याचे लक्ष्य ठेवावे
By Admin | Updated: August 11, 2015 04:07 IST2015-08-11T04:07:52+5:302015-08-11T04:07:52+5:30
महापालिकेचे विद्यार्थी मोठ्या गुणांनी व संख्येने उत्तीर्ण होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. या विद्यार्थ्यांचे लक्ष्य चांगल्या हुद्द्याची नोकरी जरी असली तरी त्यांनी आदर्श नागरिकही होण्याकडे लक्ष

विद्यार्थ्यांनी आदर्श नागरिक बनण्याचे लक्ष्य ठेवावे
मुंबई : महापालिकेचे विद्यार्थी मोठ्या गुणांनी व संख्येने उत्तीर्ण होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. या विद्यार्थ्यांचे लक्ष्य चांगल्या हुद्द्याची नोकरी जरी असली तरी त्यांनी आदर्श नागरिकही होण्याकडे लक्ष
ठेवावे तसेच त्याकामी शिक्षक-पालकांनीही लक्ष द्यावे, असे प्रतिपादन महापौर स्नेहल आंबेकर यांनी केले.
पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृती परीक्षा सन २०१४-१५ च्या स्पर्धेत महापालिकेच्या सुमारे १०० विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केल्याबद्दल त्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ दादर येथील बी. एन. वैद्य सभागृहात पार पडला. याप्रसंगी आंतरराष्ट्रीय स्तरावर फुटबॉल खेळासाठी निवड करण्यात आलेला सुनील मोहन राठोड, सुनील तुळशीराम राठोड व मदन राठोड या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच राष्ट्रीय खेळात सुयश मिळविणाऱ्या सहा विद्यार्थ्यांचाही विशेष गौरव करण्यात आला. याचवेळी राज्य स्तरावर घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक (इयत्ता चौथी) शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन करणाऱ्या ८८ व माध्यमिक शाळांत (इयत्ता सातवी) परीक्षेत १२ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)