जनतेच्या रक्षकांना विद्यार्थिनींनी बांधल्या राख्या

By Admin | Updated: August 10, 2014 23:37 IST2014-08-10T23:37:26+5:302014-08-10T23:37:26+5:30

कोणताही सण असो, पोलीस आपल्या घरी न जाता नेहमी परिसरातील जनतेचे रक्षण व शांतता ठेवण्याचे काम करतात.

The students of the public have been built by the students | जनतेच्या रक्षकांना विद्यार्थिनींनी बांधल्या राख्या

जनतेच्या रक्षकांना विद्यार्थिनींनी बांधल्या राख्या

मनोर : कोणताही सण असो, पोलीस आपल्या घरी न जाता नेहमी परिसरातील जनतेचे रक्षण व शांतता ठेवण्याचे काम करतात. अशावेळी सण- समारंभही त्याला अपवाद रहात नाही, तरीही परिसरात चोरी, खून, मारामारीच्या घटना घडतच असतात. आजच्या रक्षाबंधनाच्या सणाला पोलीस बांधवांकडून रक्षणाचे वचन घेण्याकरिता लालबहादूर शास्त्री हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी मनोर पोलीस ठाण्याचे सहा.पो.नि. मारूती पाटील यांसह सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना राख्या बांधल्या. रेस्क्यू फाऊंडेशच्या सुधारगृह येथील मुलींनीही राख्या बांधल्या.
प्रत्येक बहीण आपल्या भावाला राखी बांधून आपली रक्षा करण्याचे वचन त्याच्याकडून घेते. आपल्या बहिणीला पैसे, खाऊ किंवा गिफ्ट यावेळी आवर्जून देतो. दूरदूरहून बहिणाबाई आपल्या लाडक्या भाऊरायाला राखी बांधण्यासाठी माहेरी येतात. गुण्यागोविंदाने रक्षाबंधनाचा सण साजरा करतात, परंतु पोलीस हा आपल्या कुटुंबासहित कधीही सण साजरे करीत नसल्याने ते आपली ड्युटी करुन जनतेचे रक्षण करीत असतात. नेहमी ते परिसरात शांतता ठेवण्याचे कार्य करीत असतात. त्यांच्या मनात पण बहिणीबद्दल प्रेम, आपुलकी आहे. लालबहादूर शास्त्री हायस्कूल व रेस्क्यू फाऊंडेशन सुधारगृहातील मुलींना पो. उपविभागीय अधिकारी जयंत बजबळे, सहा. पो. नि. मारुती पाटील तसेच मनोर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना राख्या बांधल्या. (वार्ताहर)

Web Title: The students of the public have been built by the students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.