Join us  

सीईटी सेलच्या गोंधळावर विद्यार्थी संघटना आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 7:17 AM

तासन्तास संगणकासमोर बसून आधी नोंदणी केली, त्यानंतर दोन-तीन दिवस सलग सेतू सुविधा केंद्रावर हेलपाटे मारले

मुंबई : तासन्तास संगणकासमोर बसून आधी नोंदणी केली, त्यानंतर दोन-तीन दिवस सलग सेतू सुविधा केंद्रावर हेलपाटे मारले आणि आता व्यावसायिक अभ्यासक्रमाची ही संपूर्ण प्रक्रियाच रद्द केल्याने अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, आर्किटेक्चर अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी व पालकांनी संताप व्यक्त केला आहे. तर, सीईटी सेलच्या या ढिसाळ कारभारावर नाराजी व्यक्त करताना विद्यार्थी संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. सोमवारपासून नव्याने सुरू होणाºया प्रक्रियेमध्ये तरी सीईटी सेलने विद्यार्थी-पालकांचा विचार करत आवश्यक सुविधांची पूर्तता करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.सीईटी सेलच्या पदाधिकाºयाच्या हलगर्जीपणामुळे अडीच लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची व्यावसायिक अभ्यासक्रमाची नोंदणी रद्द झाली आहे. त्यामुळे पालक, विद्यार्थ्यांना आर्थिक, मानसिक त्रास सहन करावा लागला असून त्यांचा वेळही वाया गेला आहे. त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेत गोंधळ सुरू असल्याचा आरोप प्रहार विद्यार्थी संघटनेकडून राज्य सरकारवर करण्यात आला. युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही राज्य सामायिक परीक्षा संचालकांची भेट घेतली. एमएचटी-सीईटीच्या मुंबई येथील कार्यालयावर धडक देऊन समन्वयक महाजन यांना जाब विचारला. त्या वेळी २४ जूनला सकाळी १२ वाजता आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू होईल व ती व्यवस्थित सुरू राहील, असे आश्वासन महाजन यांनी दिले. तसेच पर्सेंटाइलवरून झालेल्या गोंधळाचे स्पष्टीकरण देताना एकूण किती विद्यार्थी त्या विषयाच्या परीक्षेसाठी बसले होते, त्याची आकडेवारी घेण्यात येईल, असे सांगितले.अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेची जबाबदारी डीटीईकडेराज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षावर (सीईटी- सेल) इंजिनीअरिंग प्रवेश प्रक्रिया रद्द करण्याची नामुष्की ओढावल्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण विभागाला (डीटीई) उशिरा का होईना प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी सहभागी करून घेतले. शनिवारी सुट्टी असताना राज्याचे तंत्र शिक्षण संचालक डॉ. अभय वाघ यांनी राज्यातील सर्व तंत्र शिक्षण सहसंचालकांना कार्यालय सुरू करण्याच्या व कार्यक्षेत्रातील सर्व सुविधा केंद्र सुरू करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार एका दिवसात राज्यातील ३०० सुविधा केंद्रे सुरू करण्यात आली. त्यामुळे सोमवारपासून इंजिनीअरिंगची प्रवेश प्रक्रिया सुरळीतपणे सुरू होऊ शकेल.

टॅग्स :विद्यार्थी