Join us

विद्या विकास मंडळाच्या विद्यार्थ्यांनी साकारला पर्यावरणपूरक गणपती बाप्पा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2023 19:15 IST

या गणेश मूर्तीचे विसर्जन शाळेच्या आवारात कृत्रिम विहिरीत केले  जाणार आहे.

मुंबई- भारतीय संस्कृतीमधे सण उत्सव व परंपरेला खूप महत्वाचे स्थान आहे. विद्यार्थ्यांना पर्यावरण जतन व संवर्धन करण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न या सण व उत्सवातून अंधेरी पश्चिम दादाभाई रोड येथील विद्या विकास मंडळ विद्यालयात होत असतो. गणेशोत्सव पर्यावरणपूरक व आनंददायी व्हावा याकरिता विद्यार्थ्यांसाठी  शाडूच्या मातीच्या पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळा आयोजित केली होती.

शाळेचे माजी विद्यार्थी वैभव पटवर्धन,आशिष म्हात्रे व प्रशांत नरवणकर यांनी श्री गणेश मूर्ती साकारण्यासाठी  मार्गदर्शन केले. मुलांनी अतिशय सुबक आणि देखण्या मूर्ती बनविल्या व रंगविल्या आणि स्वनिर्मितीचा आनंद घेतला.

या गणेश मूर्तीचे विसर्जन शाळेच्या आवारात कृत्रिम विहिरीत केले  जाणार आहे. विसर्जनानंतर तयार झालेली माती बाप्पाला वाहिलेल्या फुलांच्या निर्माल्यापासून बनविलेल्या सेंद्रिय खतात मिसळून विद्यार्थ्यांनीच बनवून जोपासलेल्या शाळेच्या परसबागेसाठी वापरण्यात येईल.

टॅग्स :मुंबईइको फ्रेंडली गणपती 2023गणेशोत्सव