केंद्र बदलल्याने विद्यार्थ्यांची तारांबळ!
By Admin | Updated: March 4, 2015 02:11 IST2015-03-04T02:11:01+5:302015-03-04T02:11:01+5:30
दहावीची परीक्षा सुरू होण्याच्या ऐन तोंडावर राज्यातील शेकडो परीक्षा केंद्रांत अचानक बदल करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांत प्रचंड गोंधळ उडाला आहे.

केंद्र बदलल्याने विद्यार्थ्यांची तारांबळ!
श्रीनारायण तिवारी ल्ल मुंबई
दहावीची परीक्षा सुरू होण्याच्या ऐन तोंडावर राज्यातील शेकडो परीक्षा केंद्रांत अचानक बदल करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांत प्रचंड गोंधळ उडाला आहे. संबंधित शाळांनी सोमवारी आपल्या सूचना फलकांवर परीक्षा केंद्रात बदल झाल्याची माहिती जाहीर केली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. वास्तविक राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना हॉल तिकीटे मिळाली असून, त्यावर त्यांच्या परीक्षा केंद्रांचे नावही अंकित आहे. मात्र, अचानक आलेल्या या बदलाच्या वृत्तामुळे विद्यार्थी भयभीत झाले असून, बहुतांश विद्यार्थी व त्यांच्या पालकांना शाळेत चकरा माराव्या लागत आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने चूक झाल्याची कबुली दिली असून, विद्यार्थ्यांना नुकसान न होण्याची हमी दिली आहे. शिक्षण विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, औरंगाबाद, पुणे, नागपूर, नाशिक आदी मोठ्या शहरांत परीक्षा केंद्रांच्या मुद्यावरून गोंधळ उडाल्याच्या तक्रारी आहेत. यात सर्वाधिक तक्रारी मुंबई आणि ठाणे जिल्ह्याबाबत आहेत. विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रे मोठ्या प्रमाणात बदलली आहेत. मुंबई आणि ठाण्यात १७३ परीक्षा केंद्रांत बदल करण्यात आला आहे. मुंबईतील १६२ आणि ठाण्यातील ११ परीक्षा केंद्रांचा समावेश आहे.
ठाणे शिक्षणाधिकाऱ्यांना नोटीस : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे संचालक गंगाधर म्हमाणे यांनी हॉल तिकिटावर छापण्यात आलेल्या परीक्षा केंद्रांवरच परीक्षा व्हायला हवी हे मान्य केले. आधीच कळाले असते तर उपकेंद्रांनाच मुख्य केंदे्र बनवून त्यांची नावे हॉल तिकीटावर छापली असती. त्यामुळे गडबड होण्याची वेळच आली नसती, असेही म्हमाणे म्हणाले. याबाबत कोकण विभागाचे शिक्षण उपसंचालक लक्ष्मीकांत पांडे म्हणाले की, ठाण्यातील चुकांबद्दल जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यास कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
दहावीची परीक्षा सुरू
च्महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावीची परीक्षा मंगळवारी सुरू झाली. पहिला
पेपर सुरळीत पार पडला असून राज्यात कॉपीची ४0 प्रकरणे
समोर आली आहेत.
च्शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळातून २१ हजार ९ शाळांमधील एकुण १७ लाख ३२ हजार ८९८ विद्यार्थी दहावी परीक्षेला बसले आहेत. यात मुंबई विभागातील ३ लाख ८२ हजार ४३७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
च् शिक्षण मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार विद्यार्थ्यांना परीक्षेच्या नियोजित वेळेपुर्वी १0 मिनिटे अगोदर पेपर देण्यात आला.
च्राज्यात कॉपीची एकूण ४० प्रकरणे समोर आली असून यामध्ये सर्वाधिक १६ प्रकरणे ही औरंगाबाद विभागीय मंडळात घडली आहेत. तर त्या खालोखाल अमरावती विभागीय मंडळात आठ, नाशिक विभागीय मंडळात सात, नागपूर मंडळात पाच आणि पुणे विभागीय मंडळात चार प्रकरणे समोर आली आहेत.
हॉल तिकिटावर एक नाव, परीक्षा भलत्याच केंद्रावर : ऐनवेळी अनेक केंद्रांनी जागेच्या कमतरतेसह अनेक समस्या असल्याचे सांगितले. त्यामुळे जिल्हापातळीवर मोठ्या प्रमाणात परीक्षा उपकेंद्रे तयार करणे भाग पडले. त्यामुळे हॉल तिकीटवर परीक्षा केंद्राचे नावे वेगळी अन् परीक्षा भलत्याच केंद्रावर असल्याचे चित्र आहे.
शिक्षण विभागाची चूक : परीक्षा केंद्रांची निवड करणे, त्यांची क्षमता आणि व्यवस्था पाहण्याची जबाबदारी जिल्हा शिक्षण विभागाची असते. मात्र, या विभागाने ठाणे आणि मुंबईत याकडे लक्ष दिले नाही, असा आरोप पालकांकडून होत आहे.