विद्यार्थी इमारतीच्या प्रतीक्षेत

By Admin | Updated: January 7, 2015 22:18 IST2015-01-07T22:18:51+5:302015-01-07T22:18:51+5:30

माणगाव तालुक्यातील नांदवी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) इमारतीचे उद्घाटन होऊन वर्ष उलटले तरी विद्यार्थी अद्याप जुन्याच इमारतीत प्रशिक्षण घेत आहेत.

Student waiting for the building | विद्यार्थी इमारतीच्या प्रतीक्षेत

विद्यार्थी इमारतीच्या प्रतीक्षेत

पूनम धुमाळ ल्ल गोरेगाव
माणगाव तालुक्यातील नांदवी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) इमारतीचे उद्घाटन होऊन वर्ष उलटले तरी विद्यार्थी अद्याप जुन्याच इमारतीत प्रशिक्षण घेत आहेत.
१९८९ पासून नांदवी येथील आयटीआय कॉलेज सुरू आहे. मात्र अनेक वर्षे प्रशिक्षण भाड्याच्या इमारतीत सुरू होते. शासनाने निधी उपलब्ध करून दिल्यावर आयटीआयची हक्काची इमारत उभी राहिली. जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते डिसेंबर २०१३ मध्ये नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. मात्र सध्या ही इमारत केवळ नावापुरतीच उभी असून किरकोळ कामे बाकी असल्याने उद्घाटनानंतरही नवीन इमारत कार्यान्वित झालेली नाही.
नवीन इमारतीच्या परिसरात सध्या झाडे-झुडपे वाढली आहेत. परिसरातील वीज कनेक्शन जोडण्यात आलेले नाही. शिवाय बांधकाम साहित्य, पाइप इतरत्र पडलेले आहेत. आयटीआय संस्थेत विविध अभ्यासक्रमांसाठी साधारण शंभरहून अधिक मुले शिक्षण घेत आहेत. नवीन इमारत असताना देखील सध्या भाड्याच्याच इमारतीत अपुऱ्या जागेत विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत असल्याची खंत शिक्षकांमधूनही व्यक्त होत आहे.
इमारतीच्या सुरक्षा भिंतीचे काम अपूर्ण आहे, पाणी पुरवठ्याचीही सुविधा नाही. सार्वजनिक बांधकाम खात्याकडून इमारतीचा ताबा घेतल्यानंतर उर्वरित कामे पूर्ण करणार असल्याचे सांगण्यात येते. मात्र इमारतीचे काम पूर्ण झाल्याशिवाय ताबा घेणे शक्य नाही.
- सी. एच. पडलवार,
प्राचार्य, आय. टी. आय.
नांदवी

इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. केवळ किरकोळ कामे बाकी असून ती लवकरच पूर्ण करू. निविदा प्रस्तावात असलेली सर्व कामे पूर्ण झाली आहेत. असे असताना प्राचार्य इमारतीचा ताबा घेण्यास तयार नाही. त्यासाठी पत्रव्यवहारही झाला.
- एस. आर. जाधव,
सहाय्यक अभियंता, माणगाव.

 

Web Title: Student waiting for the building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.