विद्यार्थिनीची नोकरीच्या नावाखाली फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:06 IST2021-03-31T04:06:23+5:302021-03-31T04:06:23+5:30
मुंबई : विद्यार्थिनीला नोकरीचे आमीष दाखवत तिची ५० हजार रुपयांना फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी वडाळा पोलीस अधिक तपास ...

विद्यार्थिनीची नोकरीच्या नावाखाली फसवणूक
मुंबई : विद्यार्थिनीला नोकरीचे आमीष दाखवत तिची ५० हजार रुपयांना फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी वडाळा पोलीस अधिक तपास करत आहेत.
वडाळा परिसरात २६ वर्षीय तक्रारदार तरुणी कुटुंबीयांसोबत राहण्यास आहे. तिने नोकरी डॉट कॉम या संकेतस्थळावर नोकरीसाठी अर्ज केला. काही दिवसाने याच संकेतस्थळावरून बोलत असल्याचे सांगून, तरुणीने चांगल्या पगाराची नोकरी देण्याचे आमिष दाखविले. पुढे एक लिंक पाठवून त्यात तपशील भरण्यास सांगितले. त्यात माहिती भरताच तरुणीच्या खात्यातून पैसे कमी होण्यास सुरुवात झाली. यात ५० हजार रुपये कमी झाले. याबाबत संबंधित व्यक्तीकडे चौकशी करताच संबंधित महिला नॉट रिचेबल झाली. यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच विद्यार्थिनीने तत्काळ वडाळा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार पोलीस अधिक तपास करत आहेत.