एड्स निर्मूलनाबाबत विद्यार्थ्यांची जनजागृती
By Admin | Updated: December 2, 2014 00:17 IST2014-12-02T00:17:21+5:302014-12-02T00:17:21+5:30
जागतिक एड्स निर्मूलन दिनानिमित्त वाशी व ऐरोली येथे महाविद्यालयीन तरुणांनी रॅली काढून नागरिकांमध्ये एड्सबाबत जानजागृती केली.

एड्स निर्मूलनाबाबत विद्यार्थ्यांची जनजागृती
नवी मुंबई : जागतिक एड्स निर्मूलन दिनानिमित्त वाशी व ऐरोली येथे महाविद्यालयीन तरुणांनी रॅली काढून नागरिकांमध्ये एड्सबाबत जानजागृती केली.
एड्स या आजाराबाबत अद्यापही समाजामध्ये अनेक गैरसमज पसरलेले आहेत. त्यामुळे एड्सबाधित रुग्णासोबत वागणुकीतही भेदभाव केला जातो. नागरिकांमधील हे गैरसमज दूर करुन एड्सबाबत जनजागृती करण्यासाठी १ डिसेंबर हा दिवस साजरा करण्यात येतो. त्यानुसार सोमवारी शहरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वाशी येथील राजीव गांधी महाविद्यालयाच्या एनएसएस युनिट तर्फे रॅली काढण्यात आली. त्यामध्ये महाविद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध संदेश लिहिलेले फलक हाती घेतलेले होते. त्याद्वारे एड्सबाबत जनजागृती करण्यात आली. त्याचप्रमाणे ऐरोली येथेही सेंट झेवियर्स शाळेतर्फेही रॅलीचे काढण्यात आली. (प्रतिनिधी)