विद्यार्थी,पालकांमुळेच लोकमत नं.१
By Admin | Updated: February 5, 2015 23:05 IST2015-02-05T23:05:32+5:302015-02-05T23:05:32+5:30
महाराष्ट्रात लोकमतचा वाचकवर्ग मोठा आहे. त्याचबरोबर विद्यार्थी आणि पालकांच्या सहकार्यामुळेच लोकमत नंबर वन आहे

विद्यार्थी,पालकांमुळेच लोकमत नं.१
कुडूस : महाराष्ट्रात लोकमतचा वाचकवर्ग मोठा आहे. त्याचबरोबर विद्यार्थी आणि पालकांच्या सहकार्यामुळेच लोकमत नंबर वन आहे असे प्रतिपादन लोकमतचे सहाय्यक वितरण व्यवस्थापक हरूण शेख यांनी कुडूस येथील नॅशनल इंग्लिश स्कूल येथील संस्काराचे मोती या स्पर्धेतील विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण कार्यक्रमातून केले.
शेख म्हणाले की, महाराष्ट्रात रोज लोकमत अंकाचा खप २० लाखाच्या पुढे तर देशात लोकमतचा चौथा क्रमांक आहे. लोकमत पालक व शिक्षक यांच्याबरोबर मुलांना चांगले संस्कार देण्याचे काम करीत आहे. या वयात चांगले संस्कार अंगी बाणले तर तेच आपल्या जीवनाला चांगले वळण लावणार आहेत. जीवन सुखकारक करणार आहेत. संस्काराचे मोती या लोकमतच्या उपक्रमात नॅशनल इंग्लिश स्कूल कुडूस व ह.वि. पाटील विद्यालय चिंचघर या शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला होता. उत्कृष्ट चिकट वही तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांना यावेळी हरुण शेख, सहाय्यक वितरण व्यवस्थापक संदीप शिंदे, नॅशनल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मुस्तफा मेमन, शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा सुरकर, सुमन नायर, सहाय्यक शिक्षक पराग बडगुजर, मुजफ्फर शेख व सुजाता पाटील यांच्यासह लोकमतचे कुडूस व वाडा प्रतिनिधी यांच्या हस्ते बक्षिसे व प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. (वार्ताहर)