एसटीच्या स्मार्ट कार्ड योजनेला मार्चपर्यंत मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:06 IST2020-11-28T04:06:56+5:302020-11-28T04:06:56+5:30
मुंबई : एसटी महामंडळाच्या स्मार्ट कार्ड योजनेला ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. परिवहन मंत्री ...

एसटीच्या स्मार्ट कार्ड योजनेला मार्चपर्यंत मुदतवाढ
मुंबई : एसटी महामंडळाच्या स्मार्ट कार्ड योजनेला ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी सांगितले, काेरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेक प्रवाशांना आगारात येऊन स्मार्ट कार्ड घेणे शक्य नसल्याने तसेच त्यासंबंधीची माहिती आगारात येऊन प्रत्यक्ष देता येत नसल्याने या योजनेला ३० नोव्हेंबर, २०२० ऐवजी ३१ मार्च, २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.