बलाढ्य केरळ पराभूत
By Admin | Updated: February 15, 2015 23:41 IST2015-02-15T22:57:03+5:302015-02-15T23:41:26+5:30
जयंत चषक राष्ट्रीय फुटबॉल:नागपूरचा रब्बानी संघ विजयी

बलाढ्य केरळ पराभूत
मिरज : मिरजेत आयोजित जयंत चषक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत अटीतटीच्या सामन्यात नागपूरच्या रब्बानी संघाने केरळ संघाचा २-० असा धक्कादायक पराभव केला. बेंगलोर आर्मी विरुद्ध जी. एम. मुंबई व शिवाजीयन्स पुणे विरुद्ध कोलकाता या संघांदरम्यान उपांत्यपूर्व लढत झाली. बलाढ्य केरळ विरुद्ध रब्बानी, नागपूर यांच्यातील सामना रोमहर्षक झाला. रब्बानी संघाच्या खेळाडूंनी केरळ संघाच्या आक्रमणाला जोरदार प्रतिकार करीत पूर्वार्धात गोल नोंदवला. पिछाडीवर गेल्याने केरळ संघाच्या आघाडीच्या खेळाडूंनी धसमुसळा खेळ केला. उत्तरार्धात केरळच्या एका खेळाडूस पंचांनी पिवळे कार्ड दोनवेळा दाखविल्याने त्यास बाहेर जावे लागले.
उत्तरार्धात दहा खेळाडूंसह खेळणाऱ्या केरळ संघाची बचावफळी उद्ध्वस्त करीत रब्बानी संघाच्या खेळाडूंनी दुसरा गोल नोंदवून आघाडी भक्कम केली. स्थानिक प्रेक्षकांनीही केरळ संघाला जोरदार प्रोत्साहन दिले. सामना जिंकून रब्बानी संघाच्या खेळाडूंनी जल्लोष केला.उपउपांत्यपूर्व फेरीत बेंगलोर आर्मी विरुद्ध जी. एम. मुंबई व शिवाजीयन्स पुणे विरुद्ध तलतलासंग कोलकाता यांच्यात सामने झाले. आज, सोमवारी उपांत्यपूर्व फेरीतील उर्वरित सामने होणार आहेत.