सावरवाडीत जमिनीच्या वादावरून हाणामारी
By Admin | Updated: May 8, 2014 02:44 IST2014-05-07T20:35:34+5:302014-05-08T02:44:18+5:30
रोहा तालुक्यताील सावरवाडी येथे जमिनीच्या वादावरून झालेल्या हाणमारीत ५ जणांना गंभीर दुखापत झाली

सावरवाडीत जमिनीच्या वादावरून हाणामारी
रोहा : रोहा तालुक्यताील सावरवाडी येथे जमिनीच्या वादावरून झालेल्या हाणमारीत ५ जणांना गंभीर दुखापत झाली असून जखमींची अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे रवानगी करण्यात आली आहे. याप्रकरणी ९ जणांविरुध्द रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटनेबाबत रोहा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुतारवाडी नजिक दूरटोल येथील गट क्र. ६४२ मध्ये राकेश जयराम देशमुख यांची १० एकर जमीन आहे. या मारहाण प्रकरणातील आरोपी अशोक सखाराम शिर्के आणि रामचंद्र शिर्के यांचीही याच गटात जमीन आहे. सदर जमीनीवरून कोर्टात वाद सुरू आहे. या गोष्टीचा राग मनात धरून आरोपींनी गैर कायद्याची मंडळी जमवून राकेश जयराम देशमुख, जयेश देशमुख, पायल देशमुख, विजय सावंत, जयश्री देशमुख यांना रस्त्यात अडवून स्टील पाईप आणि केबल वायरने मारहाण करून जखमी केले आहे. आरोपी बाळकृष्ण शिर्के, गणेश नरेश काशिनाथ, सागर, सतिष, उषा, माधुरी सागर आणि वसंत राजाराम मुंबरे यांच्या विरोधात रेाहा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार घाडगे हे अधिक तपास करीत आहेत.
(वार्ताहर)