पेट्रोल भरण्यास उशीर केल्याच्या रागात कर्मचाऱ्यांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 23:32 IST2019-03-03T23:32:49+5:302019-03-03T23:32:52+5:30

पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्यास उशीर केला म्हणून चौकडीने पेट्रोलपंप चालकासह तेथील कर्मचाऱ्यांना शुक्रवारी बेदम मारहाण केली.

Strike employees in the wake of the delay in filling petrol | पेट्रोल भरण्यास उशीर केल्याच्या रागात कर्मचाऱ्यांना मारहाण

पेट्रोल भरण्यास उशीर केल्याच्या रागात कर्मचाऱ्यांना मारहाण

मुंबई : पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्यास उशीर केला म्हणून चौकडीने पेट्रोलपंप चालकासह तेथील कर्मचाऱ्यांना शुक्रवारी बेदम मारहाण केली. याप्रकरणी दहिसर पोलिसांनी दोघांना अटक करत, अन्य दोघांचा शोध सुरु केला आहे.
दहिसरच्या एस.व्ही रोड येथील पेट्रोलपंपावर इम्तीयाज खान (६८) नोकरी करतात. त्यांच्या तक्रारीनुसार, शुक्रवारी रात्री ८ च्या सुमारास ते पेट्रोलपंपावर कार्यरत असताना, दोन तरुण दुचाकीवरुन तेथे धडकले. एका गाडीत पेट्रोल भरत असल्याने, दोघांना थांबण्याचा इशारा केला. तेव्हा, दुकलीने तेथील कर्मचारी मथविन याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.
१० मिनिटाने ती दुकली आणखीन दोघांना घेऊन येथील कार्यालयात आले. मथविनसह राजकुमार सिंग, रंजित सिंग या कर्मचाऱ्यांना मारहाण सुरु केली. एकाने त्याच्या हातातील हेल्मेट खान यांच्या डोक्यात घातला. कार्यालयातील प्लास्टीक खुर्च्याही डोक्यात घातल्या. त्यानंतर ही चौकडी पळून जात असतान, त्यातील दोघांना पकडले. त्यांना थेट पोलीस ठाण्यात आणले. शंकर गौतम रय (१९) तसेच फ्रान्सीस शंकर देशवानी (१९) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

Web Title: Strike employees in the wake of the delay in filling petrol