A strict action on unauthorized parking | अनधिकृत पार्किंगवर कारवाईचा दणका
अनधिकृत पार्किंगवर कारवाईचा दणका

बेकायदा पार्किंगसाठी दहा हजार रूपये दंडाची आकारणी महापालिकेने रविवारपासून सुरू केली़ मुंबईतील २६ ठिकाणी ही कारवाई होणार आहे़ कारवाईच्या पहिल्याच दिवशी पालिकेने सुमारे लाखभर दंड वसुल केला आहे़ या कारवाईत पालिका अधिकारी व वाहन चालकांमध्ये शाब्दिक चकमकही झाली़ काही ठिकाणी वाहने हटवून रस्ते मोकळे करण्यात आले़ लोअर परळ येथे अशाच प्रकारे अनधिकृत पार्किंगमधील वाहने हटवून रस्ता मोकळा करण्यात आला़ त्यातही मुंबईकरांनी या कारवाईचे स्वागत केले आहे़ या सर्वाचा आढावा ‘लोकमत’ने घेतला.


कारवाई सुरु झालेली ठिकाणे
वरळी स्कीम क्रमांक ५२, लोअर परळ डिव्हिजन, मेटल बॉकस कंपनी, हिंद सायकल रोड.
वाशिगंटन हाऊस, अल्ट्रामाऊंट रोड, डहाणूकर मार्ग.
एल्को मार्केटजवळ, आईस फॅक्टरी गल्ली, वांद्रे पश्चिम.
साकीविहार रोड, तुंगे गाव, कुर्ला पश्चिम.
साकी चांदिवली फार्म रोड, बुमरँग इमारतीजवळ, कुर्ला पश्चिम.
टोपीवाला मार्केट इमारत, गोरेगाव रेल्वेस्थानक पश्चिम.
वन इंडिया बुल सेेंटर, ज्युपीटर मिल, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ
कोलेकल्याण कलिना, सीएसटी रोड, सांताक्रुझ.
लोढा एक्सेलस, अपोलो मिल कम्पाऊंड, एन.एम.जोशी मार्ग
चूनवाल ग्रीन जीएमएलआर रोड, नाहूर गाव (प)
एम.जी.एम हॉस्पीटल, परळ शिवडी विभाग
सीएसटी रोड, सांताक्रुझ (पू) च्एल. बी. एस. मार्ग, मुलुंड (प)
कांजूर गाव, कांजूरमार्ग (पू) च्मलबार कुमबाला हील विभाग
विश्वेश्वर रोड, गोरेगाव (पू)

विनामूल्य पार्किंग
जय प्रकाश रोड,
ओशीवारा मेट्रो स्टेशन, अंधेरी (प)
विक्रोळी व्हिलेज,
एल. बी. एस. रोड, विक्रोळी (प)
हब मॉल, प. दु्रतगती महामार्ग, गोरेगाव (पू.)
सेनापती बापट मार्ग, मुंबई मिल,
लोअर परळ डिव्हिजन
पंडित जवाहरलाल आणि मदन मोहन मालविया रोड, मुलुंड (प.)
सेनापती बापट मार्ग, कमला मिलजवळ, लोअर परळ.


लवकरच सुरु होतील
परळ शिवडी डिव्हीजन
ओशिवरा व्हिलेज, ओशिवरा लिंक रोड, अंधेरी (प.)
देवीदास लेन, बोरीवली (प)


दादरमध्ये सार्वजनिक वाहनतळच नाही
दादर परिसरात सार्वजनिक वाहनतळ नसल्याने पार्किंग कुठे करायची, असा प्रश्न दरररोज वाहन चालकांना सतावतो. त्यामुळे दादरच्या अनेक ठिकाणी अनधिकृत पार्किंग केली जाते. परिणामी, अशा पार्किंगमुळे वाहतूककोंडी, आपत्कालीन सेवेला जाण्यास अडथळा निर्माण होतो.
दादर स्थानकाच्या परिसरात वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे या ठिकाणी अनधिकृतरीत्या पार्किंग केल्याने वाहतूककोंडी होते. पोलिसांकडून अशा वाहनांवर कारवाई सुरू असते. मात्र, परिसरात वाहनतळ नसल्याने वाहन चालकांचा नाइलाज होतो. दादर पूर्वेकडील लखमसी नप्पू रोड येथे टॅक्सी चालकांसाठी बॅरिकेटर लावून तात्पुरता स्वरूपाचा थांबा तयार करण्यात आला आहे. या ठिकाणी स्वामीनारायण मंदिर असल्याने भाविकांची येथे प्रचंड गर्दी होते. त्यामुळे मंदिर परिसरात चारचाकी, दुचाकी यांची पार्किंग केली जाते. सार्वजनिक वाहनतळाची उभारणी केल्यास वाहन चालकांना पार्किंग करणे सोईस्कर जाईल़

पुढील महिन्यात १ हजार गाड्यांसाठी सार्वजनिक वाहनतळ उभारणार
मुंबईत २६ ठिकाणी सार्वजनिक वाहनतळ (पीपीएल) आहे. जी उत्तरमध्ये सार्वजनिक वाहनतळ नाही. त्यामुळे पुढील महिन्यात १ हजार गाड्यांसाठी सार्वजनिक वाहनतळ उभारण्यात येणार आहे. रस्त्यावर पार्किंग केल्यामुळे वाहतूककोंडी होते, अशा रस्त्यांची यादी तयार करून, पुढील आठवड्यापासून या ठिकाणी कारवाई सुरू करण्यात येणार असल्याचे, महापालिकेच्या जी/ उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितले.


वाहनतळाबाबत नागरिक अनभिज्ञ
घाटकोपर : चेंबूरमध्ये चार वाहनतळांची गरज
चेंबूरमध्ये बाजारपेठ परिसर आहे, येथे खरेदीसाठी लोकांची गर्दी असते, परंतु वाहनतळाची व्यवस्था नाही. या ठिकाणी चार वाहनतळांची आवश्यकता असल्याचे एका वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
तर घाटकोपर येथील आरसीटी मॉलसमोर वाधवा इमारतीत पालिकेला पार्किंगसाठी जागा देण्यात आली आहे. डिसेंबरपासून हे वाहनतळ खुले करण्यात आले असून, मोफत आहे, परंतु याबाबत नागरिकांना माहितीच नाही. या वाहनतळामध्ये एका वेळी १००० वाहने उभी केली जाऊ शकतात. मात्र, दररोज केवळ ७० ते ८० वाहने उभी केली जातात, असे एका पालिका अधिकाºयाने सांगितले. या वाहनतळावर वीज आणि पाण्याची सोय नाही, त्यामुळे तेथे काम करणाºया कर्मचाºयाची गैरसोय होते, तसेच येथे वीज नसल्याकारणाने रात्री सुरक्षा रक्षक थांबविता येत नाही. त्यासोबत वाहनतळाच्या शटरची दुरवस्था झाली आहे. परिणामी, रात्री वाहने उभी केली जात नाहीत. बºयाचदा वाधवा इमारतीतील सुरक्षा रक्षक वाहनांना आतमध्ये जाऊ देत नाहीत. दोन-तीन महिन्यांपूर्वी येथे मोफत पार्किंग बंद करण्यात आली होती, असे एका रहिवाशाने सांगितले.


अनधिकृत पार्किंगचा अग्निशमन दलाला अडथळा
येथून एलबीएस मार्ग जातो. मेट्रोच्या कामामुळे येथे वाहतूककोंडी असते. या रस्त्यापासून साधारण २०० मीटर अंतरावर नेवळीकर मार्गावर विक्रोळी अग्निशमन दलाचे प्रादेशिक केंद्र आहे. या परिसरातील दुकाने आणि हॉटेलमध्ये येणाºया व्यक्ती रस्त्यावरच वाहने पार्क करतात. त्यामुळे अग्निशमन दलाची वाहने जाताना अडथळा येतो. याबाबत वाहतूक विभागाशी अनेकदा पाठपुरावा केला, परंतु तात्पुरती कारवाई होते. पुन्हा जैसे थे परिस्थिती असते, असे एका अग्निशमन दलाच्या अधिकाºयाने सांगितले.


Web Title: A strict action on unauthorized parking
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.