Join us

कोरोनाकाळात नोकरदार महिलांवरील तणाव वाढला; आधीच्या तुलनेत ५० टक्के महिला अधिक अस्वस्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2020 06:45 IST

सर्वेक्षणात समाविष्ट ५० टक्के महिलांनी कोरोनाकाळात जास्त तणाव किंवा अस्वस्थपणा जाणवत असल्याचे मत नोंदवले.

मुंबई : कोरोनाकाळात ५० टक्के नोकरदार महिलांना आधीच्या तुलनेत जास्त तणाव जाणवू लागला आहे. सर्वेक्षणानुसार, कोरोनाकाळात देशातील नोकरदार महिलांवर भावनिकदृष्ट्या पुरुषांच्या तुलनेत जास्त परिणाम होत असल्याचे समोर आले आहे.सर्वेक्षणात समाविष्ट ५० टक्के महिलांनी कोरोनाकाळात जास्त तणाव किंवा अस्वस्थपणा जाणवत असल्याचे मत नोंदवले. ‘वर्कफोर्स कॉन्फिडन्स इंडेक्स’ने केलेल्या राष्ट्रीय पातळीवरील या अभ्यासात २७ जुलै ते २३ आॅगस्टच्या कालावधीत २ हजार २५४ नोकरदारांशी संवाद साधण्यात आला. यात कोरोनाकाळात नोकरदार महिलांवर झालेल्या परिणामाचा अभ्यास करण्यात आला. यात घर, नोकरी, पालकत्व, वैयक्तिक आर्थिक जबाबदारी, करिअर हे मुद्दे होते. सर्वेक्षणाअंती पुरुषांच्या तुलनेत महिला मानसिक ताणाला बळी पडत असल्याचे दिसून आले आहे.असा आहे सर्वेक्षणातील निष्कर्ष-44%महिलांना आपल्या मुलांच्या देखभालीसाठी कामाच्या तासांपेक्षा जास्त काम करावे लागते.25%फ्रीलान्स काम करणाऱ्यांना उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता वाटते.27% लोकांना वैयक्तिक बचत वाढण्याची अपेक्षा आहे.31%लोकांना येत्या सहा महिन्यांत आपल्या गुंतवणुकीत वाढीची अपेक्षा आहे.३८%नोकरदार पुरुषांनी सांगितले की, या कालावधीत त्यांच्यावरील तणाव वाढला आहे. हे सर्वेक्षण २७ जुलैपासून २३ आॅगस्टदरम्यान करण्यात आले.‘वर्क फ्रॉम होम’ने समस्या वाढल्याकोरोना आणि ‘वर्क फ्रॉम होम’मुळे महिलांचे काम आणि समस्या वाढल्या आहेत.सर्वेक्षणानुसार, सुमारे ४६ टक्के महिलांनी सांगितले की, मुले घरी असल्यामुळे त्या कामात लक्ष देऊ शकत नाहीत किंवा जास्त काम करावे लागत आहे.पाचपैकी एक म्हणजे२० टक्के महिला आपल्या मुलांच्या देखभालीसाठी कुटुंबातील सदस्य किंवा मित्रांवर अवलंबून आहेत. पुरुषांच्या बाबतीत हा आकडा ३२ टक्के आहे.सर्वेक्षणानुसार, देशातील नोकरदार मातांच्या अडचणी वाढल्या आहेत. सध्या तीनपैकी एक महिला (३१%) पूर्णवेळ मुलांची देखभाल करीत आहे. दुसरीकडे केवळ पाचपैकी एक म्हणजे १७ टक्के पुरुष पूर्णवेळ मुलांची देखभाल करीत आहेत.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहिला