Join us  

सायन-पनवेल महामार्गावर विचित्र अपघात, 10 गाड्या आदळल्या एकमेकांवर 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2017 11:21 AM

सायन पनवेल महामार्गावर मंगळवारी ( 3 ऑक्टोबर ) सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास पनवेलहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर विचित्र अपघात घडला.

भालचंद्र जुमलेदार/पनवेल - सायन पनवेल महामार्गावर मंगळवारी ( 3 ऑक्टोबर ) सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास पनवेलहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर विचित्र अपघात घडला. कलंबोळीतील मॅकडोनाल्ड परिसरात जवळपास 10 गाड्या एकमेकांवर आदळून हा विचित्र अपघात घडला. या अपघातामुळे जवळपास 2 तास वाहतूक कोंडी झाली असून सायन पनवेल महामार्गावर 3 ते 5 किलोमीटर अंतरावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

त्यातच, नवी मुंबई शहरात फिफा फुटबॉल वर्ल्डकप असल्यामुळे येथील शेकडो पोलीस कर्मचारी बंदोबस्तामध्ये व्यस्त असल्यामुळे या अपघाताकडे लक्ष देण्यासाठी पोलीस कर्मचा-यांची संख्या कमी प्रमाणात उपलब्ध असल्याचे सांगितले जात आहे.

 

टॅग्स :अपघात