Join us

मुंबई-नाशिक महामार्गावर झाला विचित्र अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 01:35 IST

अचानक बंद झाल्याने मागून येणारी कार धडकली. त्यापाठोपाठ अन्य दोन कार एकापाठोपाठ धडकल्याने चार गाड्यांचा विचित्र अपघात झाला. यात गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

कसारा : मुंबई -नाशिक महामार्गावरील कसारा बायपास (मोखवणे ) फाटा येथे शनिवारी सकाळी १० वाजता चार वाहनांचा विचित्र आपघात झाल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झाले नाही. सकाळी मुंबईहून नाशिककडे जाणारी कार भरधाव वेगात जात असताना अचानक रस्त्यात बंद पडली.

अचानक बंद झाल्याने मागून येणारी कार धडकली. त्यापाठोपाठ अन्य दोन कार एकापाठोपाठ धडकल्याने चार गाड्यांचा विचित्र अपघात झाला. यात गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कारमधील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. एका कारच्या एअर बॅग उघडल्याने गाडीतील लोक बचावले असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, या अपघातानंतर वाहनचालकांनी कारचालक किरण पाटील यांना मारहाण करीत असल्याची व अपघाताची माहिती मिळताच कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दत्तू भोये, सहायक पोलीस निरीक्षक माळी यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणली व वाहने बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली.

टॅग्स :अपघात