शहिदाच्या विधवेचे हाल संपेनात
By Admin | Updated: September 19, 2014 03:02 IST2014-09-19T03:02:27+5:302014-09-19T03:02:27+5:30
देशासाठी शहीद झालेल्या बाबाजी जाधव यांच्या 72 वर्षाच्या पत्नीला न्यायालयाने गेल्या महिन्यात आदेश देऊनही अद्याप भूखंड मिळालेला नाही़
शहिदाच्या विधवेचे हाल संपेनात
मुंबई : देशासाठी शहीद झालेल्या बाबाजी जाधव यांच्या 72 वर्षाच्या पत्नीला न्यायालयाने गेल्या महिन्यात आदेश देऊनही अद्याप भूखंड मिळालेला नाही़ उलट पुणो येथील रुग्णालयात आयसीयूमध्ये असलेल्या या ज्येष्ठ महिलेला जमीन मोजणीचे पैसे भरण्यासाठी खेड येथील भूनोंदणी अधीक्षकांनी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश जारी केल़े अखेर या विधवेने पुन्हा न्यायालयाचे दार ठोठावून ही कार्यालयीन प्रक्रिया स्वत:च नेमलेल्या एका व्यक्तीकडून पूर्ण करून द्यावी, अशी विनंती केली़
महत्त्वाचे म्हणजे शहिदांच्या कुटुंबीयांना मिळणारा भूखंड घेण्यासाठी बाबाजी यांच्या पत्नी इंदिरा यांना न्यायालयात याचिका दाखल करावी लागली़ याची दखल घेत व सरकारी कारभारावर टीका करत न्यायालयाने या महिलेला भूखंड देण्याचे आदेश गेल्या महिन्यात दिल़े त्यातून धडा घेत शासनाने या महिलेला तत्काळ भूखंड देणो अपेक्षित होत़े मात्र खेडच्या भूअधीक्षकांनी या विधवेला कार्यालयात हजर राहण्यास सांगितल़े तसेच त्यांना शेतजमीन नेमकी कोठे देणार हेही प्रशासनाने स्पष्ट केले नाही़
त्यामुळे इंदिरा जाधव यांनी अॅड़ अविनाश गोखले यांच्यामार्फत आपणच नेमलेल्या अधिकृत व्यक्तीकडून कागदोपत्री कामकाज करून घ्यावे, अशी विनंती केली आह़े