अधु:या स्वप्नांची कहाणी!
By Admin | Updated: December 11, 2014 02:27 IST2014-12-11T02:27:11+5:302014-12-11T02:27:11+5:30
साहित्याच्या क्षेत्रत आपला दबदबा कायम ठेवणारा एकेकाळचा राजबिंडा साहित्यिक चंद्रकांत खोत गेली कित्येक वर्षे विपन्नावस्थेत बेघर जगत होते.

अधु:या स्वप्नांची कहाणी!
आत्मचरित्रही अपूर्णच.. : शासनाचे उंबरठे ङिाजवूनही घराचा प्रश्न अधांतरीच
स्नेहा मोरे - मुंबई
साहित्याच्या क्षेत्रत आपला दबदबा कायम ठेवणारा एकेकाळचा राजबिंडा साहित्यिक चंद्रकांत खोत गेली कित्येक वर्षे विपन्नावस्थेत बेघर जगत होते. कित्येक वर्षे चार भिंतींच्या घरासाठी शासनाचे उंबरठे ङिाजवूनही खोत यांच्या घराचा प्रश्न अधांतरीच राहिला. नुकत्याच पार पडलेल्या खोत यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्य़ानंतर घर मिळण्याची आशा दिसू लागली होती, मात्र त्यापूर्वी खोत नावाच्या वादळाने एक्ङिाट घेतली.
मुंबईत स्वत:चे घर असावे, एवढीशी इच्छा असणारा हा साहित्यिक कायमच दुर्लक्षित राहिला. खोत यांना घर मिळवून देण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न करण्यात आले, मात्र हाती निराशाच आली़ आता हे वादळ शांत झाले आह़े परंतु शासनाने केलेल्या या घोर अनास्थेविषयी साहित्य वतरुळातून नाराजी व्यक्त होताना दिसत आहे.
दादर येथे 7 सप्टेंबर रोजी पार पडलेल्या सोहळ्य़ात साहित्यिकांनी खोतांना घर मिळवून देण्याचा निर्धार केला होता. कारण सर्वानाच त्या दिवशीही खोतांच्या डोळ्य़ातील अधुरे स्वप्न दिसत होते. त्यानंतर या प्रश्नाबाबत नव्या शासनाकडून आशा पल्लवित होत असतानाच खोत अचानक निघून गेले. (प्रतिनिधी)
चरित्र व कादंब:या
बिंब-प्रतिबिंब
(विवेकानंदांच्या जीवनावरील कादंबरी)
संन्याशाची सावली
(स्वामी विवेकानंदांच्या जीवनावरील कादंबरी)
अपभ्रंश (कादंबरी)
अनाथांचा नाथ
(साईबाबांचे चरित्र)
हम गया नहीं, जिंदा हैं
(स्वामी समर्थाच्या जीवनावरील कादंबरी)
मेरा नाम हैं शंकर
(धनकवडीच्या शंकर महाराजांच्या जीवनावरील कादंबरी)
दोन डोळे शेजारी
(स्वामी विवेकानंदांच्या जीवनावरील कादंबरी)
गण गण गणात बोते
(गजानन महाराजांचे चरित्र)
उभयान्वयी अव्यय (मुंबई परिसरातील पुरुषवेश्यांच्या जीवनावरील कादंबरी)
अलखनिरंजन
(नवनाथांच्या जीवनावर)
बाराखडी, बिनधास्त, विषयांतर.
खोत यांच्यावर पीएच़डी़
‘बिंब-प्रतिबिंब’कार चंद्रकांत खोत यांच्यावर पुणो विद्यापीठात एका शिक्षकाने पीएच.डी. केली आहे. खोतांनाही आपण पीएच.डी. करावे असे वाटल़े त्यांनी विषयही निवडला. पण प्रत्येकालाच पीएच.डी. करता येते, असे नाही. खोत यांना त्या वेळी कुणी मार्गदर्शक मिळाला नाही आणि डॉक्टर बनण्याचे खोत यांचे स्वप्न हे स्वप्नच राहिले. पुढे खोत यांचे साहित्य जसे भारदस्त होते तसेच त्यांचे व्यक्तिमत्त्वही रुबाबदार होते. अशा या अवलियाच्या एकूण साहित्यावर एका शिक्षकाने पीएच.डी. मिळविली आहे. हा सारा प्रवास एखाद्या चित्रपटाचा विषय ठरावा, असाच रोमांचक आहे. खोतांनी पीएच.डी. केली नाही, पण त्यांच्यावरच पीएच.डी. व्हावी, हीदेखील आगळीवेगळी नियती आहे.
खंडात्मक आत्मचरित्रही अपूर्णच..
नुकत्याच पार पडलेल्या अमृतमहोत्सवी सोहळ्यात खोत यांनी आपले आयुष्य लेखणीत बंदिस्त करण्याची इच्छा व्यक्त केली होती. हे आत्मचरित्र 2क् खंडांचे असेल आणि प्रत्येक खंड हा पाचशे पानांचा असेल. शिवाय ते आत्मचरित्र सरळ नसणार, त्यात पात्रं बोलणार आहेत, असे खोत यांनी सांगितले होते. खोत यांच्या जाण्याने त्यांचे झंझावती आयुष्य आता कायमचे रहस्यच बनून राहिले आहे.
कथासंग्रह : दुरेघी (दीर्घकथा), कवितासंग्रह : मर्तिक, अपभ्रंश, संपादन : अबकडई (दिवाळी अंक) (अनियतकालिक चळवळीतील एक), अन्य : गीत - घुमला हृदयी नाद हा, गीत - धर धर धरा, गीत - माळते मी माळते, चंद्रकांत खोत : व्यक्ती आणि साहित्य (खोत यांच्या साहित्याचा आढावा घेणारे पुस्तक, लेखक डॉ. कृष्णा भवारी)
अत्यंत उच्च दर्जाचे आध्यात्मिक लेखन करणारे चंद्रकांत खोत हे इहवाद आणि परमार्थ यांचा अनोखा मेळ साधणारे कलंदर साहित्यिक होते. एका बंडखोर साहित्यिकाला साहित्यविश्व मुकले आहे.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
खोतांना सरकारी घर मिळावे, यासाठी आमची खटपट सुरू होती. परंतु त्यांची ती इच्छा आता अधुरीच राहिली. ‘टॉनिक’ हे नावही खोत यांनीच सुचविले होते.
- मानकर काका
गेले काही दिवस ‘झपुङर’ वाचत आहे, त्यात क्षणोक्षणी मला खोतच दिसत होते. गेली 6क् वर्षे आमचे मैत्र टिकून आहे, पण आता खोत आमच्यात नाहीत. परंतु त्यांच्या साहित्यातून, धगधगत्या जगण्यातून नक्कीच प्रेरणा मिळेल.
- दादा गावकर
खोत हे व्यक्ती नसून अद्भुत रसायन होते. आपल्या लेखणीने साहित्य वतरुळ हादरवणारा साहित्यिक शासन दरबारी उपेक्षितच राहिला, याची खंत आहे. खोत यांच्या जाण्याने धगधगत्या पर्वाचा अंत झाल्याची भावना आहे.
- अशोक मुळ्य़े
चंद्रकांत खोत यांनी आपल्या लेखणीतून साहित्यविश्व हादरून टाकले. त्यांचे असे जाणो, यावर विश्वास बसत नाही. त्यांच्या साहित्याने लेखानाच्या तथाकथित चौकटी मोडल्या़ त्यांचे साहित्य पुढील कित्येक पिढय़ांसाठी वेगळेपण मांडणारे ठरेल, यात शंका नाही.
- डॉ. विजया वाड