विद्यापीठातील कर्मचा-यांचा पगार रखडला
By Admin | Updated: December 3, 2014 02:27 IST2014-12-03T02:27:41+5:302014-12-03T02:27:41+5:30
मुंबई विद्यापीठातील हंगामी व कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांचा नोव्हेंबरचा पगार लांबणीवर गेला आहे.

विद्यापीठातील कर्मचा-यांचा पगार रखडला
मुंबई : मुंबई विद्यापीठातील हंगामी व कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांचा नोव्हेंबरचा पगार लांबणीवर गेला आहे. पगार काढण्यास कर्मचाऱ्यांकडून दिरंगाई झाल्याने हजारो कर्मचारी वंचित आहेत. विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच असा प्रकार घडला आहे.
विधानसभा निवडणुकीचे काम विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना देण्यात आले होते. निवडणूक पार पडली तरी अनेक कर्मचाऱ्यांची यातून सुटका झालेली नाही. या सहकार्यांचे काम करण्यास इतर कर्मचाऱ्यांनी नकार दिल्याचा फटका विद्यापीठातील हजारो कर्मचाऱ्यांना बसला आहे. दरम्यान, मंगळवारी कामगार संघटनेसोबतच्या बैठकीत तोडगा निघाल्याने पगार पुढील तीन दिवसांत होतील, असे कुलसचिव डॉ. एम. ए. खान यांनी सांगितले. (प्रतिनिधी)