गणेशोत्सवासाठी ५३ रस्त्यांवरील वाहतूक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 03:14 AM2018-09-13T03:14:49+5:302018-09-13T03:15:03+5:30

गणेशोत्सव कालावधीत मुंबईत कोणत्याही प्रकारची वाहतूककोंडी होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांच्या वाहतूक पोलिसांनी कंबर कसली आहे.

The stoppage of traffic on 53 roads for Ganeshotsav | गणेशोत्सवासाठी ५३ रस्त्यांवरील वाहतूक बंद

गणेशोत्सवासाठी ५३ रस्त्यांवरील वाहतूक बंद

Next

मुंबई : गणेशोत्सव कालावधीत मुंबईत कोणत्याही प्रकारची वाहतूककोंडी होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांच्या वाहतूक पोलिसांनी कंबर कसली आहे. मुंबईतील ५३ रस्त्यांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे, तर ५६ रस्त्यांवर एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. १८ मार्गांवर मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. गणेशोत्सव काळात २८०० वाहतूक पोलीस व एक हजार ट्रॅफिक वॉर्डन वाहतुकीचे नियमन करतील. त्यांच्या साह्यासाठी विविध स्वयंसेवी संस्थांनी देखील पुढाकार घेतला आहे.
१३, १४, १७, १९ व २३ सप्टेंबर या कालावधीत अनेक मार्ग तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आले आहेत. विसर्जनाच्या दिवशी वेगळी व्यवस्था करण्यात येणार असून अनेक ठिकाणी वाहतूक वळवण्यात येईल, अशी माहिती वाहतूक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त वीरेश प्रभू यांनी दिली. गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क चौपाटी, बडा मस्जिद वांद्रे, जुहू चौपाटी, पवई येथील गणेश घाट या विसर्जन होणाºया महत्त्वाच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांची नियंत्रण केंद्रे तयार केली आहेत.
> १३ सप्टेंबर ते २३ सप्टेंबरपर्यंत हे मार्ग बंद
१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड (दक्षिण वाहिनी)- भारतमाता जंक्शन ते बावला कंपाउंडपर्यंत १३ सप्टेंबर सकाळी ६ वाजल्यापासून २३ सप्टेंबरच्या रात्री १२ वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या जड वाहनांना वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे. गणेशोत्सवादरम्यान शहरात जड वाहनांची वाहतूक बंद असल्याने पर्यायी मार्ग देण्यात आलेले नाहीत. तर याच मार्गावर १३ सप्टेंबर सकाळी ६ वाजल्यापासून ते २३ सप्टेंबर रोजी दररोज दुपारी ३ वाजल्यापासून सकाळी ७ वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. जड वाहने सोडून इतर वाहनांसाठी भारतमाता जंक्शन येथून उजवीकडे वळण घेऊन करी रोड पूल, शिंगटे मास्तर चौकातून डावीकडे वळण घेऊन एन. एम जोशी मार्ग, आर्थर रोड नाका, एस ब्रिज मार्ग, डॉ. बी. ए. रोड आणि भारतमाता जंक्शनकडून डावीकडे वळण घेऊन नाईक चौक, साईबाबा पथ येथून डावीकडून वळून जी. डी. आंबेकर मार्ग, दीपक ज्योती टॉवर, श्रवण यशवंते चौक असे पर्यायी मार्ग खुले
असणार आहेत.
२) डॉ. बी. ए. रोड (दक्षिण वाहिनी ) - डॉ. बी. ए. रोड दक्षिण वाहिनीने गॅस कंपनी चौकातून साने गुरुजी मार्ग उजवीकडे जाणारी वाहतूक १३ सप्टेंबर सकाळी ६ वाजल्यापासून ते २३ सप्टेंबर रात्री १२ वाजेपर्यंत सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली आहे. यासाठी गुलाबराव गणाचार्य चौकात (आर्थररोड नाका ) जाण्यासाठी डॉ. बी. ए. रोड , भारतमाता जंक्शनकडून उजवीकडे वळून करी रोड रेल्वे पूल, शिंगटे मास्तर चौकातून डावे वळण एन. एम. जोशी मार्ग, गुलाबराव गणाचार्य चौक आणि या चौकात जाण्यासाठी डॉ. बी. ए. रोड गॅस कंपनी जंक्शन येथून सरळ जाऊन काळाचौकी जंक्शन, बावला कंपाउंड येथे यू टर्न घेऊन डॉ. बी. ए. रोड (उत्तर वाहिनी) गॅस कंपनी जंक्शनकडून डावे वळण घेऊन एन. एम. जोशी मार्ग, गुलाबराव गणाचार्य चौक असा पर्यायी मार्ग असेल.
३) चिंचपोकळी रेल्वे पुलावरून साने गुरुजी मार्गाने गॅस कंपनी जंक्शन येथे उजवीकडे जाणारी वाहतूक १३ सप्टेंबर सकाळी ६ ते २३ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत २४ तास सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या मार्गासाठी चिंचपोकळी रेल्वे पुलावरून साने गुरुजी मार्गाहून सरळ डॉ. बी. ए. रोड (उत्तर वाहिनी) भारतमाता जंक्शनवरून उजवे वळण घेऊन जी. जी. भाई लेन, साईबाबा पथ, ग. द. आंबेकर मार्ग, श्रवण यशवंते चौक, अल्बर्ट जंक्शन, तानाजी मालुसरे मार्ग, टी. बी. कदम मार्ग, बावला कंपाउंड, डॉ. बी. ए. रोड हा मार्ग खुला असेल. चिंचपोकळी पुलावरून येणारा साने गुरुजी मार्ग (उत्तर वाहिनी) १३ सप्टेंबरपासून अनंत चतुर्दशीपर्यंत २४ तास वाहतुकीसाठी बंद करण्यात येईल. यासाठी चिंचपोकळीहून एन. एम. जोशी मार्गावरून पुढे येऊन एस ब्रिज मार्गे पर्यायी वाहतुकीसाठी रस्ता सुरु ठेवण्यात आला आहे.
४) एस.एस. राव रोडवरील नाईक चौक ते लालबाग पोलीस चौकी हा रस्ता उद्यापासून अनंत चतुर्दशीपर्यंत २४ तास वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येईल. मात्र, स्थानिकांची वाहने सोडण्यात येतील.
५) दत्ताराम लाड मार्ग - डॉ. बी. ए. रोडवरील सरदार हॉटेल जंक्शन ते श्रवण यशवंते चौक (दोन्ही बाजूने) १३ सप्टेंबरपासून अनंत चतुर्दशीपर्यंत २४ तास वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. प्रवासी डॉ. बी. ए. रोडवरून श्रवण यशवंते चौकाकडे जाण्यासाठी डॉ. बी. ए. रोडने बावला कंपाउंडकडून डावे वळण आणि टी. बी. कदम मार्गावरून उजवे वळण, तानाजी मालुसरे मार्गावरून डावे वळण घेऊन रामभाऊ भोगले मार्ग आणि श्रवण यशवंते चौकाकडे येऊ शकतात. श्रवण यशवंते चौकाकडून डॉ. बी. ए. रोडकडे येण्यासाठी अल्बर्ट सर्कल जंक्शनकडून उजवे वळण आणि तानाजी मालुसरे मार्गावरून डावे वळण घेऊन टी. बी. कदम मागार्ने डॉ. बी. ए. रोडकडे जाऊ शकतात.

Web Title: The stoppage of traffic on 53 roads for Ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.