रेल्वेची जमीन विकणे बंद करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 06:20 IST2019-07-08T06:20:50+5:302019-07-08T06:20:52+5:30
धारावी पुनर्विकासाला रेल्वे कर्मचाऱ्यांचा विरोध

रेल्वेची जमीन विकणे बंद करा
मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वेची जमीन धारावी झोपडपट्टी पुनर्विकासासाठी देण्याच्या विरोधात रविवारी माटुंगा रोड पश्चिम रेल्वे कॉलनी बचाव समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. माटुंगा रोड येथील पश्चिम रेल्वे कॉलनीमधील रेल्वे कर्मचाऱ्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी ‘रेल्वेची जमीन रेल्वेच्या विकासासाठी वापरावी’, ‘रेल्वेची जमीन विकणे बंद करा’ अशा घोषणा आणि फलक घेऊन धारावी पुनर्विकासाला रेल्वे कर्मचाºयांनी विरोध केला.
रेल्वेची ४५ एकर जमीन मिळाल्यानंतर धारावीच्या ३५० एकर जमिनीवर व्यावसायिक पुनर्वसन करण्यात येणार आहे. यासंदर्भात राज्य सरकार आणि रेल्वे यांच्यात धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी जमिनीचा करार झाला आहे.
पश्चिम रेल्वे वसाहतीत १ हजार २०० रेल्वे कर्मचारी राहतात. मात्र पाच एकर जमिनीवर इमारती उभारून रेल्वे कर्मचाºयांच्या वसाहतीचे पुनर्वसन केले जाणार आहे.
तर, उर्वरित जमीन धारावी पुनर्विकासासाठी वापरण्यात येणार आहे. यातून मिळणारा एफएसआय राज्य सरकारद्वारे ठरविण्यात येणार असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले.
माटुंगा रोड पश्चिम रेल्वे वसाहतीमधील रेल्वे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय अनेक वर्षांपासून
येथे राहत आहेत. वसाहतीतील रहिवाशांची कोणतीही बाजू समजून न घेता रेल्वेने निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे सर्व रहिवासी बेघर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धारावी पुनर्विकासाच्या निर्णयाविरोधात आंदोलन केले, असे समितीच्या वतीने सांगण्यात आले.
रेल्वेला मिळणार ८०० कोटी रुपये
च्रेल्वेची जमीन पहिल्यांदाच झोपडपट्टी पुनर्विकासासाठी देणार आहे.
४५ एकरपैकी मध्य रेल्वेच्या मालकीची २८.५६ एकर आणि पश्चिम रेल्वेच्या मालकीची १६.४४ एकर जमीन आहे. या व्यवहारात रेल्वेला ८०० कोटी रुपये मिळणार आहेत.