मुंबईत चार दिवस मांस विक्री बंद

By Admin | Updated: September 8, 2015 01:48 IST2015-09-08T01:48:16+5:302015-09-08T01:48:16+5:30

मीरा-भार्इंदर महापालिकेपाठोपाठ आता मुंबई महापालिकेनेही जैन धर्मीयांच्या पर्युषण काळात चार दिवस मांस विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपाच्या मागणीनुसार

Stop selling meat for four days in Mumbai | मुंबईत चार दिवस मांस विक्री बंद

मुंबईत चार दिवस मांस विक्री बंद

मुंबई : मीरा-भार्इंदर महापालिकेपाठोपाठ आता मुंबई महापालिकेनेही जैन धर्मीयांच्या पर्युषण काळात चार दिवस मांस विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपाच्या मागणीनुसार पालिका आयुक्तांनी मांस विक्रीचा प्रस्ताव मंजूर केला आहे.
मीरा-भार्इंदर पालिका क्षेत्रात पर्युषण सप्ताहामुळे आठ दिवस मांस विक्रीवर बंदी लागू केली आहे. मुंबई महापालिका क्षेत्रातही आठ दिवस मांस विक्री बंद ठेवण्याचा प्रस्ताव भाजपाने तयार केला होता. तो पालिका आयुक्तांकडे मांडून तो मंजूर करून घेतला. आयुक्तांनी चार दिवस मांस विक्री बंद ठेवण्यास परवानगी दिली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पालिकेने देवनार कत्तलखान्यात १०, १२, १३, १७, १८ सप्टेंबर म्हणजेच श्रावण वद्य, भादर्व सूद एकम, गणेश चतुर्थी, संवत्सरी या पर्युषणपर्व काळात पशुहत्या बंद ठेवण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे.

Web Title: Stop selling meat for four days in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.