Join us
Daily Top 2Weekly Top 5

अंधेरीत मनसेचा रास्ता रोको; जालन्यातील घटनेवरून संताप

By मनोहर कुंभेजकर | Updated: September 4, 2023 20:30 IST

जालन्यातील मराठा आरक्षण आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठी चार्ज विरोधात मनसेचा आज सायंकाळी जूहू सर्कल येथे मनसे स्टाईलने निषेध आंदोलन केले. 

मुंबई- जालन्यातील मराठा आरक्षण आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठी चार्ज विरोधात मनसेचा आज सायंकाळी जूहू सर्कल येथे मनसे स्टाईलने निषेध आंदोलन केले. मनसेचे अंधेरी पश्चिम विधानसभा विभाग अध्यक्ष  मनिष धुरी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच  कुशल धुरी ( उपाध्यक्ष म. न. वि. से. ) आणि  किशोर राणे ( उपविभाग अध्यक्ष ६६/६७ ) यांच्या नेतृत्वाखाली सदर निषेध आंदोलन केले.

यावेळी आज सायंकाळी ६ वाजता जुहू सर्कल येथे रास्ता रोको करण्यात आला.पोलिसांनी आंदोलकांना अटक करून नंतर सोडून दिले.यावेळी विभागातील  पुरूष व महिला पदाधिकारी आणि मनसैनिकांनी या आंदोलनात भाग घेतला अशी माहिती कुशल धुरी यांनी दिली.

टॅग्स :मुंबईअंधेरीमराठा आरक्षण