पालिका कर्मचाऱ्यांवर दगडफेक, जेसीबीच्या काचा फोडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 02:41 IST2018-03-30T02:41:53+5:302018-03-30T02:41:53+5:30

अनधिकृत फेरीवाल्यांची दादागिरी दिवसेंदिवस वाढत असून

The stones of the municipal corporation, the JCB scandal broke | पालिका कर्मचाऱ्यांवर दगडफेक, जेसीबीच्या काचा फोडल्या

पालिका कर्मचाऱ्यांवर दगडफेक, जेसीबीच्या काचा फोडल्या

मुंबई : अनधिकृत फेरीवाल्यांची दादागिरी दिवसेंदिवस वाढत असून कुर्ला येथे वाहतुकीला अडथळा ठरणा-या फेरीवाल्यांवर कारवाई करणा-या महापालिका कर्मचा-यांवर फेरीवाल्यांनी दगडफेक करून त्यांना मारहाण करण्याची घटना नुकतीच घडली.
कुर्ला ‘एल’ विभागातील अनधिकृत फेरीवाल्यांवर पालिकेची कारवाई होत असून साकीनाका ३ नंबर खाडी येथील पदपथ आणि रस्त्यावरील अनधिकृत टपरी, गाड्या, बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यासाठी सहायक आयुक्त अजितकुमार आंबी यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या महापालिका कर्मचाºयांवर फेरीवाल्यांनी केलेल्या दगडफेकीत कर्मचारी जखमी झाले आहेत. अतिक्रमण निर्मूलन पथक फेरीवाल्यांचे साहित्य डम्परमध्ये भरत असताना हे साहित्य खेचून अधिकाºयांना धक्काबुक्की करण्यात आली.
याबाबत सरकारी कामात अडथळा निर्माण करून यंत्रणेचे नुकसान केल्यासंबंधी साकीनाका पोलिसांनी गुन्हा दाखल झाला आहे. वरीष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दत्ता तांडाले तपास करीत असून सरबेज, बन्सराज यादव आणि गुलाम सरवर या तिघा हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.

Web Title: The stones of the municipal corporation, the JCB scandal broke