पोट भरण्याची मारामार; मी टॅक्स कशाला भरू?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:07 IST2021-09-22T04:07:12+5:302021-09-22T04:07:12+5:30

मुंबई अत्यंत सामान्य उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना कर भरण्यातून सूट मिळते व जास्त उत्पन्न आहे अशांनाच कर भरावा लागतो, असा ...

Stomach-filling fights; Why should I pay taxes? | पोट भरण्याची मारामार; मी टॅक्स कशाला भरू?

पोट भरण्याची मारामार; मी टॅक्स कशाला भरू?

मुंबई

अत्यंत सामान्य उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना कर भरण्यातून सूट मिळते व जास्त उत्पन्न आहे अशांनाच कर भरावा लागतो, असा गैरसमज आपल्याला अनेकदा दिसून येतो; मात्र सरकार दरबारी आपल्या उत्पन्नाची नोंद रहावी यासाठी प्रत्येकाने आयटीआर फाईल करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे भविष्यात विविध फायद्यांचा लाभ घेता येतो. तसेच सरकार दरबारी आपल्या खर्चाची व उत्पन्नाची नोंद राहते.

आपण टॅक्स भरता का?

कामगार - आधीच आम्हाला कमी उत्पन्न आहे. त्यात जर दरवर्षी कर भरला तर स्वतःजवळ काय शिल्लक राहणार.

ऑटो चालक - गाडीत सीएनजी भरताना, विमा काढताना तसेच बँकेला कर्जाचे हप्ते देताना आपोआप कर देतोच की वेगळा का भरायचा.

भाजीपाला विक्रेता - कर भरण्याएवढे आम्ही कमवतच नाही. तर कर भरण्याचा प्रश्नच येत नाही.

फेरीवाला - कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे कर कसा भरणार.

सिक्युरिटी गार्ड - वर्षाचे उत्पन्न एक लाख सुद्धा नाही. मग कर कशाला भरायचा.

सफाई कामगार - मिळणाऱ्या पगारात कुटुंब सांभाळायचे की कर भरायचा.

सलून चालक - भविष्यात गृहकर्ज घेणे सोपे व्हावे यासाठी मी आयकर भरत आहे.

लॉन्ड्री चालक - कोरोनाच्या आधी झिरो आयटीआर फाईल केली होती. नंतर २ वर्षे फाईल अपडेट केली नाही.

घर काम करणाऱ्या महिला - आमचे हातावर पोट, त्यात आयकर कसा भरणार.

प्रत्येकजण टॅक्स भरतो

प्रत्येक जण अप्रत्यक्षरीत्या कोणता ना कोणता कर भरतच असतो. तसेच अडीच लाखाहून अधिक उत्पन्न असणाऱ्यांना आयकर भरावा लागतो; मात्र तरीदेखील कमी उत्पन्न असणाऱ्यांनी देखील झिरो आयटीआर फाईल करणे गरजेचे आहे. यामुळे तुम्ही कर भरत नसलात तरी देखील, सरकारकडे तुमच्या उत्पन्न व खर्चाची नोंद राहते. तसेच विजा, कर्ज या गोष्टी मिळताना अडचणी येत नाहीत. - प्रसाद उपाध्ये, सी.ए., अर्थतज्ज्ञ

Web Title: Stomach-filling fights; Why should I pay taxes?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.