वाशीतील जागृतेश्वर मंदिरात चोरी
By Admin | Updated: May 13, 2015 01:13 IST2015-05-13T01:13:41+5:302015-05-13T01:13:41+5:30
वाशी येथील जागृतेश्वर मंदिरात मंगळवारी पहाटेच्या सुमारास चोरी झाली आहे. मंदिराची दानपेटी फोडून त्यामधील २५ हजार रुपये लंपास

वाशीतील जागृतेश्वर मंदिरात चोरी
नवी मुंबई : वाशी येथील जागृतेश्वर मंदिरात मंगळवारी पहाटेच्या सुमारास चोरी झाली आहे. मंदिराची दानपेटी फोडून त्यामधील २५ हजार रुपये लंपास करण्यात आले आहेत. हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. परंतु मंदिर परिसरात व आतमध्ये असलेल्या अंधारामुळे त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
वाशी सेक्टर-७ येथील जागृतेश्वर मंदिराच्या खिडकीचे ग्रील तोडून ही चोरी करण्यात आली आहे. दोन अज्ञात चोर खिडकीतून मंदिरात घुसले. दानपेटी तोडून त्यामधील २५ हजार रुपये चोरले. दोन महिन्यांपूर्वीच या मंदिराचा जीर्णोद्धार झाला. मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पडला. परिसरातील जुने व प्रसिद्ध असे हे धार्मिक स्थळ आहे. सोमवारी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी गर्दी करत असतात. यावेळी त्यांच्याकडून दानपेटीत मोठ्या प्रमाणात दान टाकले जाते. हीच संधी साधत सोमवारी मध्यरात्री अज्ञातांनी दानपेटी फोडली. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात अज्ञात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. (प्रतिनिधी)