प्रतीक्षानगरात कांद्याच्या १४ गोणी चोरल्या

By Admin | Updated: August 23, 2015 00:16 IST2015-08-23T00:16:31+5:302015-08-23T00:16:31+5:30

वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांच्या डोळयात पाणी आणणाऱ्या कांद्यावर आता चोराचीही वक्रदृष्टी पडली आहे. एका विकेत्याने विक्रीसाठी आणलेला २४ हजार रूपये किंमतीचा

Stolen 14 pieces of onion in the waiting area | प्रतीक्षानगरात कांद्याच्या १४ गोणी चोरल्या

प्रतीक्षानगरात कांद्याच्या १४ गोणी चोरल्या

मुंबई : वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांच्या डोळयात पाणी आणणाऱ्या कांद्यावर आता चोराचीही वक्रदृष्टी पडली आहे. एका विकेत्याने विक्रीसाठी आणलेला २४ हजार रूपये किंमतीचा कांदा चोरटयांनी लंपास केला. ही घटना प्रतिक्षा नगर येथे घडली. या प्रकरणी व्यापाऱ्याने वडाळा टी टी पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे.
दोन आठवडयांपासून कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळेच ही घटना घडली असावी, असा अंदाज पोलीस वर्तवितात. नाईक भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनी विक्रीसाठी आणलेली कांद्याची १४ पोती काल रात्री पळवली. माहितीगाराचेच हे कृत्य असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.

Web Title: Stolen 14 pieces of onion in the waiting area