Join us

बनावट खाद्यतेलाचा साठा केला जप्त, सुमारे ६ लाखांचा साठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2020 04:09 IST

Mumbai News : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुकानात छापा टाकत २ लाख ५० हजार ३१५ किलोचा ४ लाख ८१ हजार ११८ रुपयांचा बनावट तेलाचा साठा जप्त केला.

मुंबई : राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाने बनावट तेलाचा साठा करणाऱ्यांविरोधात तीव्र मोहीम हाती घेतली आहे. नळ बाजार, बोहरा इमाम रोड, हंसराज खिमराज अँड कंपनीत बनावट तेलाचा साठा असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन विभागाला मिळाली.अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुकानात छापा टाकत २ लाख ५० हजार ३१५ किलोचा ४ लाख ८१ हजार ११८ रुपयांचा बनावट तेलाचा साठा जप्त केला. बनावट तेलाचे नमुने घेत प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. हंसराज खिमराज अँड कंपनीत बनावट तेलाचा साठा जप्त करण्यात आला असून पाम तेल, रिफाईंड पामोलिन तेल, रिफाईंड सनफ्लावर तेल, रिफाईंड ग्रोनेट तेल असा २ लाख ५० हजार ३१५ किलो बनावट तेलाचा साठा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत ४ लाख ८१ हजार ११८ रुपये असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.  

प्रयोगशाळेत तपासणी नाहीतेलाची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आलेली नाही, अनहायजेनिक साठा, नामांकित कंपनीच्या नावाचा वापर केल्याचा संशय अशा विविध कारणांवरुन या दुकानातून साठा जप्त करण्यात आला असून दुकानदारास वस्तू विक्री करण्यास बंदी घातल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

टॅग्स :अन्न व औषध प्रशासन विभागमुंबई